Saturday, May 19, 2012

मित्रानो,
मला  एक सुंदर अनुभव सगळ्यांबरोबर सांगावासा वाटतोय.
मी जेव्हापासून बेकरिचा कोर्से शिकलेय तेव्हापासून मनात इच्छा होती कि जो
आनंद मला मिळतोय, घरात वाढदिवस असल्यावर स्वतःच्या हाताने केक बनवायचा
आणि तो हि अगदीच बाहेरच्या केक सारखा, हा आनंद सगळ्यांना मिळावा म्हणून
मी हे बेकरीचे व्ह्र्कशोप करायचे ठरवले.
मला खूप उत्तम प्रतिसाद हि मिळाला आई आणि  मुलांचा.
आम्ही सगळे मे 8 ला आमच्या कडे भेटलो आणि एकूण 25 ते 30 जण मिळून खूप चं
छान वेळ घालवला.  यामधे मुलांना बेसिक चोकोलेट केक शिकवला आणि सगळ्यांनी
तो अतिशय सुंदर पणे केला, एकूण मुलांची expertise खूप जास्त दिसत होती.
आमची पूर्ण एक बेडरूम केक्स नि भरली होती कारण फ्रीझ मध्ये सगळे केक मावत
नसल्याने AC लाऊन आम्ही केक्स ठेवले होते आणि ते जवळ जवळ 15 ते 20 केक्स
होते.
आम्ही नंतर ब्रेंड बनवला आणि सगळ्या आईना वजन कमी करण्यासाठी एक घरघुती
उपाय सापडला,
कारण ब्रेंड बनवताना पुश उप्स मारल्यासारखे सगळे वजन ब्रेंड च्या कणिक
वरघालून तो हाताने मळायचा असतो
अगदी 10 मिनिटे आणि पंखा हि बंद करावा लागतो.
अनिरुद्ध ने तर सगळे पाहून हसत बोलला "ब्रेंड खाऊन नाही तर बनवताना नक्की
आमच्या कॅलोरीएस कमी  होणार ".
दुपारी सगळ्यांनी छान पणे स्वरूपा मावशीने आणलेला पुलाव, धनश्री मावशीचा
ढोकळा, प्राची मावशीचे  गुलाबजाम, आंबे खाल्ले.
सगळ्या आया बाकी गोष्टी सांभाळत होत्या म्हणून मला चांगले पणे शिकवणे
सोपे  गेले. संध्याकाळी मग सगळ्यांनी स्वतः बनवलेला पिझ्झा आणि केक
खाल्ला आणि आमचा दिवस संपला.
या सगळ्यात अजून एक छान गोष्ट घडली ती म्हणजे समृद्धीचा मिळालेला प्रतिसाद.

जेव्हा मी पहिल्यांदा शिबिरात बेकरीच्या गोष्टी आणायला चालू केल्या
तेव्हा समृद्धीचे बाबा आवर्जून बोलले कि, समृद्धीला बेकिंग ची फार आवड
आहे आणि मी ते लक्षात ठेवून तिला केक च्या रेसिपेस पाठवल्या आणि  तिने
त्या सगळ्या करून पहिल्या आणि मला फोन करून सांगितले हि.
जेव्हा मला आदल्या दिवशी,आयांची लिस्ट बनवताना कळले कि समृद्धीचे नाव यात
नाही आहे तर मी त्यांना फोन केला आणि फक्त आदल्या रात्री माझा  पत्ता
समजून घेऊन त्यांनी समृद्धीला वेळेवर पाठवले ही.               अनिरुद्ध
ला हि खूप आवड आहे जेवण बनवायची हे मला भाग्यश्री ने सांगितले होते,ती
येऊशकली नाही पण अनिरुद्ध नक्की आला आणि बाकी मुलांबरोबर खाली खेळायला न
जाता पूर्ण वेळ कित्चेन मध्ये सगळे काही पहात होता.
सर्वेश ने कागदाची फुले  बनवून आणली तर ईश्वरी ने ती फुले ठेवायला रंगीत
फ्लोवेर् पॉट बनवला, दिव्याने सुंदर फोटो फ्रेम बनवली  तर समृद्धीने
सुंदर चोकोलेट चा गिफ्ट बोकस बनवला.
हे सगळे फोटो मी खाली लावले आहेत.
ईशा महात्मे, स्वानंदी, सिमरन, आराध्य, उन्मेष परांजपे, विरज, आर्या या
सगळ्या मुलांच्या येण्याने आणि  एवढ्या छान पणे केक शिकून तो बनवण्याने
माझे हे व्ह्र्कशोप सार्थक झाल्या सारखे वाटले,
आणि या सगळ्यात सर्वात मोठा मुलगा होता तो म्हणजे "आदित्य", तो दरवेळेस
कित्चेन मध्ये येऊन प्रत्येक  गोष्ट निट लक्ष देऊन पहात होता आणि मधुरा
ला सूचना देत होता कि आपण हे सगळे करू या. आम्ही  सगळ्यांनी बाकी मुलांची
आणि आयांची आठवण काढली आणि त्यांना हि तो आनंद मिळावा म्हणून आज लिहित
आहे.
नंतर सर्वेश, ईश्वरी आणि विरज आमच्याकडे राहिले आणि आम्ही खूप मजा केली.
रात्री तर मी आणि जयंत  त्यांच्या गप्पा एकतच राहिलो जेव्हा ते समदुखी
भाऊ आणि त्यांना त्रास देणाऱ्या बाबा च्या लाडक्या बहिणी यावर  चर्चा करत
होते आणि त्यांचे अनुभव ऐकून खूप हसलो हि कारण सगळच मजेशीर होते. त्यात
ते सगळे भाऊ हसत हे पण सांगत  होते कि या बहिणी सगळे काही मोठे मोठे करून
सांगतात आणि मग शेवट आम्हाला हि घरात्ल्यांकडून मोठे मोठे चा मिळते.
आम्हा सगळ्यांसाठी खूप सुंदर अनुभव या सगळ्यांनी दिला आणि त्या सुंदर
आठवणी आता आमच्या कडे आता नेहमी राहतील।

वेदांत, महेक & मेघना, जयंत.

No comments:

Post a Comment