Wednesday, May 30, 2012

शिबिराचे महत्व जाणवून ही होणारे कमी योगदान....

Hello,

मी जेव्हा शिबिरात आले तेव्हा माझ्या आधी महेश जे माझे आधीच्या ऑफिस मधले बॉस होते त्याना जाणवले होते की मला आणि मुलाना या समाजाची जास्त गरज आहे।

मी जेव्हा शिबिरात यायला चालू केले तेव्हा माझा हाच गैरसमज होता की, आज माझी मुले एकटी आहेत म्हणून त्याना हे शिबिर खुप उत्तम आहे। जेव्हा मी खुप नियमित पणे मीटिंग ला आले आणि सगळ्या गोष्टी ज्या आजी सांगायचा प्रयत्न करायच्या त्या पड़तालूंन पहिल्या तेव्हा समजले की " I stand no where in my life"
आणि मला खुप मोठे बदल करणे जरुरीचे आहे, हे बदल जरुरीचे होते माझ्या साठी आणि मुलांच्या त्या त्या वयाच्या गरजा समजुन घेण्या साठी। माझ्या वागण्यात ही असंख्य चूका होत्या ज्याचा त्रास मुलाना होतच होता।
मग मी विचार केला जे घडून गेले आहे ते तर नीट करता नाही येणार पण येणारे आयुष्य सुन्दर करायच माझ्या साठी, मुलां साठी आणि ती प्रत्येक व्यक्ति जी आमच्या आयुष्यात येणार।
आज या गोष्टी सातत्याने केल्याने आयुष्यात एक शान्तता आली आहे।
मला असे नेहमी वाटते की एखादी चुक जेव्हा शिबिरात, रोजच्या जीवनात सारखी घडते तेव्हा कुठेतरी आपली जाणीव खुप कमी पड़ते।

या आपल्या विषयावर मी आणि जयंत जेव्हा बोलत होतो तेव्हा ही गोष्ट जाणवली की, आज शिबिराचा एक भाग म्हणून वावरताना आपल्या चूका आपल्याला कळत आहेत आणि त्या सुधारयाला सम्पूर्ण वाव देखिल असतो आणि त्याचे मुख्य कारण आहे " Acceptance" नाही तर बाहेरच्या जगात कुठे कुणाला फरक पडतो आपण कसे वागतोय किवा जी व्यक्ति चुकत असते तिला भीती असते की कोणी तरी येउन आपली चुक सांगणार। मग आम्ही ठरवले की जेव्हा आपण एवढे नशीबवान आहोत तर मग ही कृत्द्न्यतेची जाणीव सतत वाढवायची आणि पुढे येउन मदत करायची आणि जिथे आम्हाला मदतीची गरज आहे तिथे समोरच्या व्यक्ति वर विश्वास ठेवून ती घ्यायची पण स्वस्थ बसून कोणी तरी काही तरी करेल याची वाट नाही पहायची तर आज जो प्रश्न दुसरयाचा आहे तर तो पुढे माझा ही होऊ शकतो याचे गाम्भीर्य लक्षात घ्यायचे।

मेघना - जयंत

No comments:

Post a Comment