शिबिरातील ४ कुटुंब ११ , १२ ,१३ या दिवशी मुरुडला गेलो होतो. आधीच्या रविवारी आम्ही पंडितांच्या घरी या ट्रीपच्या योजनेसाठी जमलो होतो. आम्ही एकूण १२ जणांनी या सहलीत सहभाग घेतला. ११ तारखेला सकाळी ७ वाजता पार्ल्यातील २ कुटुंब पहिल्यांदा बसमध्ये बसली . नंतर कुर्ल्याला आणखी २ कुटुंब बसमध्ये बसली. १२ जणांमध्ये २ मुले व ३ मुली होत्या. गाडी एकदम खटारडी होती. खटारडी म्हणजे गाडी पळताना पाठच्या डिक्कीचा दागाडागा दागाडागा असा आवाज येत होता. अशा गाडीतून आम्ही फणसाड जवळच्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. आम्ही खर तर जंगलातल्या एका तंबूत राहणार होतो. पण आयांनी अशी तक्रार केली कि ' तंबूत दिवे तसेच बाथरूम नसेल तर आम्ही तंबूत राहणार नाही.' म्हणून सुदान्शुकाकाने डोंगराच्या पायथ्याशीच या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. हॉटेलचे मनेजर म्हणाले आत्ता तीन a c खोल्या आणि १ सूट १ दिवसासाठी उपलब्ध आहेत. आम्ही त्या खोल्या पाहील्या आणि बुक केल्या. मग आम्ही आपापले टोट घेऊन खोल्यांमध्ये गेलो.
मग आम्ही मुले पत्ते खेळलो. 3:30 वाजता सगळे तयार झालो कारण आम्हाला फणसाड अभयारण्यात जायचे होते. जंगलात प्रवेश करण्यासाठी घाटाचा मार्ग अवलंबावा लागला. जंगलात जाताना सोबत खायला काहीही घेऊन जायचे नाही असे आम्ही ठरवले. जंगलात आम्ही जाऊन येऊन ५ किलोमीटर चाललो. आम्हाला त्या दिवशी एकही प्राणी दिसला नाही. पण आमच्या सोबत एक कुत्रा आला होता. तो आमच्या सतत पुढे असायचा. कितीतरी वेळा तो कुत्रा मध्येच कुठेतरी गायब व्हायचा. थोड्यावेळाने तो कुठूनतरी यायचा. तो येताना मी सारखा फसायचो, कारण तो येताना जंगलातून यायचा. मला वाटायचे कि हा कोणतातरी वन्य पशु आहे. पण तो जेव्हा बाहेर यायचा तेव्हा मला कळायचे कि हा कोणताही वन्य पशु नसून हा तर माणसाळलेला कुत्रा आहे. मग तिकडन परत हॉटेलला आलो.आम्ही पटापट कपडे बदलले आणि जेवायला आलो. जेवण झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत गेले. आणि झोपले कारण पुढच्या दिवशी सकाळी पहाटे परत फणसाड अभयारण्यात जायचे होते. पुढच्या दिवशी सकाळी पहाटे उठून सगळ आवरल आणि खाली गाडीपाशी आलो. तर गाडीचा चालकच गुल होता. आम्ही त्याला खूप खूप शोधला. पण सारे व्यर्थ. पण आमच्या आवाजाने तो आपणून उठला आणि बाहेर आला, त्याने हात धुतले आणि गाडी सुरु केली. आम्हाला निघायला ४ : ३० होऊन गेले होते. ५:३० ला आम्ही फणसाड अभयारण्यात पोचलो. आमच्याबरोबर तिकडचे फोरेस्ट
ऑफिसर आले होते. मी सारखा त्यांच्याच पाठी होतो. त्यामुळे मला सोडून बाकीच्या कोणालाच शेकरू खार दिसली नाही. मला एकट्यालाच दिसल्याब्द्द्ल ते मला बाबू म्हणाले. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला शेकरूचे घरटे आणि सुकलेल्या पानांच्याच रंगाचा बेडूक दिसला. त्यानंतर मला हरणटोळ साप फोरेस्ट ऑफिसरानी दाखवला त्यांची नजर एकदम तीक्ष्ण होती. मग मी त्या सापाचे रपारप फोटो काढले. आणि मग त्यांनीच तो साप बाहेर काढला. तो साप सर्वांनी हाताळला. आणि सोडून दिला. मला साप बघून खूप आनंद झाला. मग आम्हाला 1 मचाण दिसले. त्यावर गेलो. वरन आम्हाला समुद्र दिसत होता. त्या समुद्रात ४ बोटीसुद्धा होत्या . थोड्यावेळाने आम्ही खाली उतरलो. आणि पुढे चालायला लागलो. आकाशात सर्पगरुडाची जोडी उडताना दिसली. खूप चालल्या मुळे सर्व दमलो होतो. पण मला जंगलातच रहावेसे वाटत होते
unmesh paranjape

Unmesh,
ReplyDeleteSorry I have to learn how to publish in Marathi so I am writing this in English.
I liked your post very much for its spontaneity. Your enthusiasm about wandering in Jungle come through so clearly.