Tuesday, May 15, 2012

या संदर्भात माझ्या काही चुका मला आठवत आहेत.
तलासरी येथील वनवासी कल्याण केंद्रावर जाण्याची कल्पना मी काढली. शिबिरातील अनेकांनी त्याला प्रतिसाद दिला. तेथे जाऊन देणग्याही दिल्या. नंतर त्या केंद्राला सक्रीय मदत करण्याचा संकल्प आम्ही केला, पण तो पुरा केला नाही, त्या संस्थेला पैशापेक्षा तेथे जाऊन मुलामध्ये मिसळून, त्यांना भावनिक आधार देणे अधिक मोलाचे वाटत होते, आजही ती त्यांची गरज आहे. आपण काही पालकांनी तसा विचारही केला होता पण पुढे तो प्रयत्न अपुराच सोडून दिला यातून मुलांना योग्य संदेश नक्कीच मिळाला नाही. तो प्रयत्न मी नेटाने पुढे चालू ठेवला असता तर बरे झाले असते असे आज वाटते.
vikas 

No comments:

Post a Comment