Friday, May 18, 2012



चारेक वर्षांपूर्वी लताआजींनी मुलांसाठी सुट्टीत अभ्यासाविषयी महिन्याभराचे निवासी शिबीर घेतले होते. रात्री मुले शिबीराच्या जागेत व मूली लताआजींच्या घरी असत. दररोज रात्री आठनंतर मुलांबरोबर एक बाबा पालक शिबीरात असे व तो रात्री मुलांबरोबर राहत असे. त्यावेळी चारवेळा मला मुलांबरोबर राहायची संधी मिळाली.
दूसऱया दिवशी सकाळी मुलांना दूध देण्याची जबाबदारी त्या पालकावर असायची. तेव्हा माझ्याकडून चूक झाली ती अशीः
एके दिवशी ओमला (लाड) सकाळीच आवरून त्याच्या शाळेत जायचे होते. त्यामुळे तो लवकर उठून त्याची तयारी करीत होता. मीही त्याला मदत करत होतो. गार्गी ओमला शाळेत घेऊन जायला सकाळीच शिबीरात आली होती. या घाईगडबडीत ओम दूध न पिता शाळेत रिकाम्यापोटी गेला. इतर मुलांना दूध देतानाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही.
संध्याकाळी आदल्या रात्रीच्या मुलांसोबतच्या गप्पागोष्टी आठवताना आपण ओमला दूध न देता रिकाम्यापोटी शाळेत पाठविले हे लक्षात आले आणि आपण मोठी चूक केली हे जाणवलं. काही वेळाने मी गार्गीला फोन करून माझी झालेली चूक सांगितली व सॉरी म्हटलं. गार्गीने मात्र फार काळजी व विचार करू नकोस असे सांगून मला दिलासा दिला.
परंतु ओम सकाळी लवकर शाळेत जाणार हे माहित असूनही मी त्याबाबत काहीच विचार केला नव्हता ही माझी घोडचूकच होती असे मला वाटते.
हे लिहिताना मला असेही वाटते की माझ्या या चूकीबद्दल मी तेव्हा ओमशीही बोलायला हवे होते.
अजय


हे अजयच्या वतीने पोस्ट केले आहे.



No comments:

Post a Comment