Sunday, July 22, 2012

माझ्या आईला बरे नसल्यामुळे सोमवारी हॉस्पिटलमध्ये admit केले. त्यात मंगळवारपासून वडिलांना चांगलाच ताप सुरू झाला. आमच्या दोघांची बरीच धावपळ होत होती. दिव्यापण ह्यामुळे stressed होती. अश्यावेळी शिबिरातील पालकांनी दिलेल्या आधारामुळे आम्ही खूपच सावरलो. लताआजी, गार्गी, सुचित्रा, महेश-स्वरूपा ह्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीने आम्ही हे दिवस शांतपणे निभावून नेवू शकलो. स्वरूपानी वेळेवर केलेल्या फोनने दिव्याचे tension पार पळून गेले (स्वरूपा तिच्याशी काय बोलली ते तिने ब्लॉगवर टाकले आहेच). महेश दररोज न विसरता फोन करून चौकशी करत होताच.

आमच्या घरच्या कामवाल्या बाईने आणि आईला संभाळणार्‍या बाईने न सांगता आम्ही नसताना घर बरेच सांभाळून घेतले.

सध्या quarter-end चे काम असल्याने ऑफिसमध्ये कामाचे बरेच pressure आहे. त्यात ही un-planned सुट्टी घ्यावी लागल्यामुळे मला थोडे guilty वाटत होते. माझ्या कलिगने ह्या परिस्थितीत मला खूपच सहकार्य केले. त्यांनी सांगितले की ऑफिसची काळजी तू करू नकोस, आम्ही सांभाळून घेऊ आणि काही लागल्यास तुला फोन करू. तू घराच्या problems वर लक्ष दे. शिवाय काही लागल्यास जरूर सांग.


प्रसाद

No comments:

Post a Comment