लोकसत्ता दिनांक ७ जुलै
२०१२च्या वास्तुरंग पुरवणी मध्ये एकलेख होता ‘उध्वस्त स्टुडिओची कहाणी’. त्यात लेखिकेने
(साधना बहुळकर) चित्रकार माधव सातवळेकर यांच्या बद्दल आणि त्यांच्या
चित्रशैली बद्दल लेख लिहिला होता. लेख वाचताना आणि
त्यातील चित्रे पाहून एकदम शिबिराची आठवण झाली. एकदा शिबिरात, विकास परांजपेनी चित्रकार
माधव सातवळेकर आणि त्यांच्या चित्रशैली बद्दल माहीती सांगितली होती आणि त्यांची
बरीच चित्रे आम्हाला दिली होती. लेखानिमित्ताने त्या चित्रांची आठवण झाली आणि सर्व
चित्रे मी मुलांबरोबर परत पाहीली. माधव सातवळेकरांची
खास शैलीअसलेली निळी रेषा (signature style) प्रत्येक
चित्रात उठून दिसत होती, मग ती निसर्गरम्य
चित्रे असोत, व्यक्ती स्वरूप चित्रे किंवा वर्णन चित्रे असोत. माधव सातवळेकरांची इतकी सुरेख चित्रे आम्हाला दिल्या बद्दल विकास परांजपेचे आभार. सर्व चित्रे बघून, परत परत बघून
आम्हाला खूप मजा आली.
जयश्री
No comments:
Post a Comment