Saturday, July 7, 2012

A GOOD EXPERIENCE

    माझे  काका  माझ्यापेक्षा  सात वर्षांनी  मोठे  आहेत . त्यामुळे लहानपणी आमची  मैत्री  होती . काका पुतणी या नात्यापेक्षा बरोबरीच्या नात्याने आम्ही वाढलो .माझ्या  लहानपणीच्या आठवणीमध्ये  या नात्याचा एक  खूप सुंदर  कप्पा  आहे .
      मोठेपणी  ते  त्यांच्या  व्यवसायात  व्यग्र  झाले .मी माझं  शिक्षण ,लग्न , व्यवसायात  रमले .जेव्हा  भेटायचो तेव्हा "काय  कसं आहे ? बर चाललंय ."  याच्यापेक्षा जास्त  बोलण  व्हायचं  नाही .मला फार चुकल्यासारखं वाटत  रहायचं .
    आता  बारावी  CET  चा   RESULT    लागल्यावर मी त्यांना  फोन केला . त्यांची चौकशी केली ,त्यांच्या मुलाचा  RESULT ,पुढे  काय वगैरे बोलण झालं . त्यानंतर  पाच  दिवसांनी त्यांचा मला  फोन आला . यावेळी  त्यांनी  ते मुलाच्या  admission साठी  करत  असलेले प्रयत्न ,वेगवेगळ्या पर्यायांचा  विचार वगैरे स्वतःहून  सांगितले  आणि मग खूप गप्पा मारल्या .फोन ठेवला आणि खूप  दिवसांपासून हरवलेलं काहीतरी सापडल्यासारख  वाटलं .मधल्या काळातला दुरावा  पूर्णपणे संपून  माझ एक छान नात्याचं  माणूस परत  मिळालं .हाच फोन मी फार पूर्वी करायला हवा होता ... असं वाटलं .पण ठीक आहे .आता या पुढे आणखीही नाती अशीच जपायची .

                                                                           ___   प्राची पाटील 




 

1 comment: