आमची कामवाली बाई तिला दिलेले जेवण पूर्वी आमच्या घरीच बसून जेवत असे. काही दिवसांपासून ती जेवण न जेवता घरी घेवून जावू लागली. मी तिला कारण विचारले तेव्हा तिने सांगितले की त्यांच्या इथे राहणाऱ्या एका गरीब आणि म्हाताऱ्या बाईला ती हे जेवण देते. मी तिला त्या बाईबद्दल माहिती विचारली तेव्हा समजले की ह्या बाईला तिची मुले बघत नाही व तिला पोटासाठी आमच्या समोरच्या रस्त्यावर भीक मागावी लागते. स्वतः एवढी गरीब असून आणि बऱ्याचदा उपाशी किंवा अर्धपोटी राहावे लागत असताना आमच्या बाईचा दुसऱ्याबद्दलचा कळवळा व ही माणुसकी पाहून माझे मन हेलावून गेले.
गायत्री
It is really nice how some people think of helping (and they do) others while they themselves go through tough times.It shows how big the maid's heart is and I'm sure that everyone's heart goes out for the people who have a big heart.
ReplyDeleteThank you for sharing this experience with us.
-Swati and Anagha