त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी योग institute मध्ये गेले असता एका झाडाखाली
मला बकुळीची
ताजी फुलं पडलेली दिसली .त्याआधी
तिथे बकुळीच
झाड आहे हे माझ्या लक्षातच
आलं नव्हतं.
केवळ तो सडा पाहूनच तिथे ते झाड असल्याचं
मला कळलं. मी ओंजळीमध्ये पटापट ती फुलं वेचून घेतली. त्यांचा सुगंध घेत घेत मी गेटच्या बाहेर आले. समोरून एक तृतीयपंथी येत होता. मला का कोणास ठाऊक ? ती फुलं त्याला दयाविशी वाटली. त्यानेही ती आनंदाने घेतली व माझ्या पाठीवर थोपटले.
आधीच त्या सुंदर फुलांनी आणि नंतर त्या घटनेने माझ्या आनंदात भर पडली.
sunita khache
I could feel your happiness which you have shared on the phone after this incident.One thing which you had shared was missing here.. that you could sence some 'MARDAV'(Marathi word) in his eyes when you gave the flowers to him.
ReplyDelete