Sunday, July 22, 2012




Happy Nagpanchami

         शनिवारी आमच्या शाळेत सर्पमित्र चंद्रकांत जाधव आले होते.त्यांना विचित्र मान हलवायची सवय होती म्हणून आम्ही त्यांचे नाव सर्पबंधू  ठेवलं होतं. ते सर्पमित्र का झाले याची कहाणी  ऐकताना भडभडून आलं.
ते गावात राहायचे. त्यांना लहानपणी साप दिसला कि मारा. असच शिकावलं होत. एकदा त्यांना हरणटोळ दिसला त्यांनी मारलं. ती मादी होती आणि pregnant पण.त्यांनी तिला मारल्यावर तिचा पोटातून लाल रक्त लागलेली २पिल्ले बाहेर आली.तेव्हा त्यांना  खूप अपराधी वाटलं म्हणून त्यांनी ठरवलं सर्पमित्र व्हायच ठरवलं.
       
    त्यांनी  सापांची माहिती खूप छान सांगितली.गारुडी कसे हाल करतो ते पण सांगितलं.त्यांनी सांगितलं,"गारुडी साप मे महिन्यात पकडतात. जुलै पर्यंत त्याला उपाशी ठेवतात.म्हणून नागपंचमीला साप नाईलाजाने दूधपण पितात. नागांचे विषाचे दात काढायला गारुडी त्यांच्या  तोंडासमोर रुमाल नाचवतात की साप तो चावतात व गारुडी तो खेचतात की सापाचे दात रुमालावर येतात. काही गारुडी तर सापांचे तोंड शिवून टाकतात. मग त्याला दूध पाजल्यावर ते दूध त्याच्या तोंडातच अडकते. त्यावर माशा बसतात. मशा त्या सापाचे तोंड कुरतडतात. मग  गारुड्यला कळते की या सापाचा आपल्याला उपयोग नाही. मग ते त्या सापाला कापून  त्याची कातडी विकतात.

साप दुतोंडी करण्याची स्वताची एक आयडिया असते. तापलेल्या लोखंडी सळईने सापांच्या शेपटीला तोंडाचा आकार दिलं जातो. 

इतके क्रूर प्रकार ऐकल्यावर आम्ही सगळेच खूपप हळवे झालो. म्हणून त्यानी आम्हाला त्या मूड मधून बाहेर काढण्यासाठी काही साप हाताळायला दिले. धामण, अजगर यांना हात लावतात्ना मजा आली. त्यांचा थंड, बुळबुळीत स्पर्श वेगळाच वाटला. 
 -मल्लिका

1 comment:

  1. Thank you Mallika for sharing this great information with us.

    ReplyDelete