Friday, July 27, 2012

      लता आजीनी रविवारी आपल्याला छोट्या बोटींना सुद्धा त्यावर असलेल्या छोट्या दिव्याच्या सहाय्याने  मोठ्या समुद्रात मार्गक्रमण करताना अडचण होत  नाही  असे सांगितले होते. कारण दिवा जरी लहान असला तरी त्याला तेज असते. व त्याच तेजामुळे मोठ्या बोटींना त्या लहान बोटींचे  समुद्रातील अस्तित्त्व  समजते. त्याच अनुषंगाने सोमवारी आकाशवाणीवर तिच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीवर त्यांनी  सांगितलेली एक आठवण सांगते.
         ज्यावेळी आकाशवाणी सोडून इतर प्रसारमाध्यम सुरु झाली तेव्हा असे वाटले कि आता आकाशवाणी कोणी ऐकणार नाही.ती संपली. परंतु त्या वेळी पु.ल. देशपांडे असे म्हणाले होते कि, काही चिंता नको. कारण कितीही मोठ्या घरात कितीही झगमगीत दिव्यांची झुंबरे असली तरी देवघरात घासून पुसून चकचकीत करून तेवत असलेल्या  पितळी दिव्याचे तेज झाकोळून जात नाही. 

  प्रियांका नवरे 

1 comment: