भावबंध
हवे हवेसे
न आवडे, रहाणे कोणा एकटे
विभिन्न ते जितके
तितकेच ते निराळे
बालपणी मायेचे
यौवनात प्रेमाचे
तारुण्यात सहचार्याचे
उतारवयात आधाराचे
वाढता, अनेक भेटती
थोडे हृदयास भिडती
काही सोबत करिती
अनेक विरून जाती
काही असती धृड
कित्येक वरवरचे
क्वचित जिव्हाळा साधती
काही हरवून जाती
प्रयत्नात वाट दाविती
यशात आनंदे दूम्बती
निराशेत आधार देती
विरहात सांत्वन करिती
काही असती अबोल
परी भावना अमोल
विश्वास असे ज्यांपरी
कृपा साधती ईश्वराची
नसे हे सर्व एकतर्फी
वाढवावे ते मने मिळवूनी
टिकावयास हि अतूट नाती
प्रेम हवे सदा अंतरंगी
किरण
WAA!!! Zakas.
ReplyDeleteVikas
मनाला खूपच भावली. सुरेख कविता.
ReplyDeleteजयश्री
I feel it is very relevent for our life with the society outside.Thank you for sharing such a wonderful feeling with us Kaka.
ReplyDelete