Friday, July 13, 2012

एक अनुभव
आमचयाकडे रोज संध्याकाळी एक 10-11 वर्षाचा मुलगा हार फुलपुडी घेऊन येतो. गेल्या महिन्यात त्याला गावी जायचे असल्यामुळे 2 आठवडे फुलपुडी टाकणार नाही असे कळवून तो रितसर रजेवर गेला.
त्या महिन्याचे फुलपुडीचे पैसे घ्यायला आला तो आला तेव्हा मला 15 दिवसांचे पैसे कापणे उचित वाटले नाही. म्हणून मी महिन्याभराचे पैसे देऊ करत होते. त्यावर तो म्हणाला, काकी, मी गेल्या महिन्यात 15 दिवसंच फुलपुडी टाकली तेव्हा मला 15 दिवसाचेच पैसे द्या.
वरून धीटाईने त्याने मला विचारले की घरी देवासमोर दिवाबत्ती तुम्हीच करता की घरातील इतर कोणी? मीच करते असं सांगितल्यावर मात्र त्याच्या भाबड्या चेहऱयावर या काकीला काही समजते की नाही? काही लक्षात राहते की नाही? असा भाव होता.
मी संपूर्ण महिन्याचे पैसे देत असताना त्याने मात्र 15 दिवसाचेच पैसे घेतले.
मला त्याच्या प्रामाणिकपणाचे तर कौतूक वाटलेच अन भाबडया धीटाईचे देखिल.

संगिता खंदारे       

No comments:

Post a Comment