नाते ,माझी एक जवळची मैत्रीण आहे तिचा कोकणातील सर्वे वस्तूंचा
व्यवसाय आहे , गेली २ वर्षे आंम्ही तिच्याकडून आंबे घेतो ,ती या सगळ्याचा
हिशोब एकदम घेते,या वर्षी नेहमीप्रमाणे तिने काही विशिष्ठ आंब्यांची किमत
कळवली परंतु हिशोबाच्या वेळेस ठरवल्या पेक्षा जरा जास्त मागितली, मी तिला
एकदा आठवण करून
दिली, परंतु ती थोडा वेळ मान्य करण्यास तय्यार नव्हती ,एक वेळ मी थोडी
नाराज झाले ,पण क्षणभरच ,शांत पणे विचार केला, तिने सांगितलेली किमत
पाकिटात घालून दिली, परत फोन करून सांगितले तूझ्यावर मी नाराज नाही ,त्या
क्षणाला ती फोन वर बोलतानाच रडायला लागली .परत तिची समजूत घालण्यास
तिच्या घरी गेले ,तिला सांगितले आपले नाते याने बिघडणार नाही,आपणच एकमेकान समजून घायला पाहिजे ,घरात तिच्या समस्या होती, तिला ती व्यक्त करता
येत नव्हती, समजावल्यावर ती शांत झाली ,या प्रसंगाने आमच्या दोघीमधील
विश्वास प्रेम वाढले ,
No comments:
Post a Comment