Monday, July 16, 2012

राजकारणातील वेगळा नेता! 

गोव्याचे मुखमंत्री मनोहर पर्रीकर हे आगळे आणि आदर्श ठरावे असे व्यक्तिमत्त्व आहे. ते भारतातील एकमेव IITian मुखमंत्री आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याचा यत्न करत आहेत. ते कायम विमानाच्या सध्या इकॉनॉमी क्लास ने प्रवास करतात, कां, तर आपल्या राज्याला जास्त खर्चात टाकू नये. साधेपणाचे मूल्य स्वतःच्या उदाहरणातून इतरांना दाखवून द्यावे. ते लाल दिव्याची गाडी फक्त सक्री कामासाठी वापरतात, इतर वेळी स्वताची खासगी गाडी. मुखमंत्री बंगला हा फक्त ऑफिस म्हणून वापरतात. झोपायला स्वतःच्या घरी जातात. लाचखोरी टाळण्यासाठी बहुतांश मोठी कंत्राटे स्वतः पास करतात. त्यानी पेट्रोलचे दर त्यांच्या राज्यात ११ रुपयांनी कमी केले- राज्याची कररुपी मिळकत कमी करून! आपले राज्य अत्यंत सुरक्षित आणि आनंदी असावे, हे त्यांचे ध्येय आहे. मी गेल्या आठवड्यात त्यांची जाहीर मुलाखत दादरला घेतली, तिथे काही तरुणांनी त्यांना विचारले की, राजकारण खूप वाईट आहे, म्हणून आम्हाला तिटकारा येतो. आम्ही राजकारणाबद्दल कां स्वारस्य दाखवावे? त्यावर पर्रीकर  म्हणाले, बजबजपुरी कुठल्याही क्षेत्रात आहे. आणि सामान्य समाजच राजकारण्यांना वाईट वागण्याची संधी देतो. ती न देण्याचा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. आपण पाणी जसे ३-४ वेळा गळून स्वच्च करून घेतो, तसे आपण आपले नेते निवडले पाहिजेत. Better of the lot निवडून मतदान केलेच पाहिजे आणि मग त्यांच्यावर वेळोवेळी नागरिकांनी दबावही टाकला पाहिजे. it is our duty to improve politics. we should be determined for that. 
एक उदाहरण सांगते, गोरेगावात आमचा एक ग्रौप नव्याने झालेला आहे- गोरेगाववकर नागरिक नावाचा. मी, मिलिंद चिटणीस आम्ही त्यात जातो. आम्ही आमच्या नगरसेवकांवर व आमदारांवर दबाव टाकून गोरेगावातील काही नागरी समस्या सोडवण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. यश कमी मिळते, विलंबाने मिळते. पण प्रयत्न टोकाचे केले की काही काळानंतर यश मिळतेच, याचा अनुभव आता ३-४ महिने सातत्याने काम केल्यावर मिळू लागला आहे. आता आमच्या तक्रारीनं नगरसेवक, BMC officers दाद देतात, मीत्तीन्ग्ला बोलावतात. सूचना विचारतात. जरा बदल नक्की होतो. 
SO folks, lets trust our own capacity to change the politics and administration. It tests our patience. But still we should! 

शुभदा 

3 comments:

  1. Its really great on his part that first of all he tried changing himself by putiing up the limitations on the luxuries which are easily availabale.He made himself an example whereby he can stand with his clean image in the society. I hereby proud to say that Mahesh always try to travel (for his official work) by low fare flight (but the good service airline)where as sometimes he has to compromise his little time or sleep.

    ReplyDelete
  2. Thank You Shubhada for writing about Mr Parrikar so promptly.
    I would like to know What he had to say about his decision of joining Politics.He being an IITian he had several options before him.Then why did he choose politics?

    ReplyDelete
  3. he has been asked by RSS leaders to join politics. He had passion to get involved in socio-political issues. He also has his business related to his knowledge earned in IIT as Metallurgical Engineer. So he combines both- his own business plus politics.
    shubhada

    ReplyDelete