Saturday, July 28, 2012

  गेल्या शनिवारी प्रियांका घरातून ऑफिसला निघताना घराची चावी नेण्यास विसरली. संध्याकाळी तिचा गोंधळ होऊ नये म्हणून मी ऑफिसला जाताना चावी आमच्या जवळ राहणाऱ्या वयस्कर आजोबांकडे नेऊन दिली व तसे प्रियांकाला कळविले.परंतु रात्री खूप  उशिरा आम्ही तिघेही एकत्रच घरी परतल्यामुळे चावी घेण्यास गेलो नाही. रविवारी आधीच ठरविलेल्या कार्यक्रमामुळे व्यग्र असल्यामुळे मी ठरविले होते कि सोमवारी संध्याकाळी त्यांच्याशी शांतपणे गप्पा करण्यासाठी जायचे व चावी घेऊन यायचे. परंतू त्यांचा रविवारी संध्याकाळी आमच्यावरील काळजीमुळे फोन आला कि ,' तुझी सोमवारी सकाळी ऑफिसला जाताना धावपळ होऊ नये  म्हणून विचारतो तू चावी का घेऊन गेला नाहीस? ' 
   मला त्यांच्याशी  आरामात गप्पा करायच्या होत्या, हे त्यांना आधी कळविणे आवश्यक होते याची मला जाणीव झाली, आणि  त्यांची माझा गोंधळ होऊ नये त्यांना माझ्याविषयी वाटलेली काळजी, तळमळ पाहून मला विशेष वाटले. 

 
   अजित 

No comments:

Post a Comment