Monday, July 9, 2012

Strong like 'KOI' fish



उन्हाळ्याच्या  सुट्टीत लताआजीनी  रेग्युलर शिबिरातील सर्वांना 'तोत्तोचान ' हे पुस्तक वाचायला सांगितले होते. जूनमध्ये आम्हाला ते पुस्तक मिळाल्यावर मी व ओम  वाचू लागलो. पुस्तक खूपच छान आहे. त्यातील  एक भाग असा आहे की 'जपानमध्ये पाच मे  या दिवशी (मुलांचा सण -बालदिन )सर्व घरांच्या छपरावर त्या त्या घरातील प्रत्येक मुलाच्या नावाचा एक कापडी किंवा कागदी रंगवलेला मासा लटकवतात. हा  'कोई ' नावाचा मासा अतिशय 'ताकदवान' असतो व तो प्रवाहाच्या विरूद्ध  दिशेने पोहून जातो अशी कल्पना आहे.मुलांनीही  त्या माश्यासारखे ताकदवान व्हाव म्हणून त्या दिवशी अश्याप्रकाराचे मासे तयार केले जातात.' - हा भाग खूप आवडला.

ह्या गुरुपौर्णिमेला ओमचे  औक्षण करताना ह्या 'कोई 'माश्याच्या डिज़ाइनचे पेंटींग  केलेला टीशर्ट त्याला भेट दिला. त्या मागची भावनाही त्याला सांगितली. ओमबरोबरच शिबिरातील आपल्या सर्वच मुलांनी या माश्यासारखेच खूप मजबूत (शरीराने व मनानेही ) बनावे असे वाटते.
  

3 comments:

  1. as usual a good art work and great thought behind it. Their is lot to learn from you.Thankyou for sharing with us.

    ReplyDelete
    Replies
    1. pleasure is all mine Mrunal. I think all of us from this shibir group try to learn many good things from each other.There are many things to learn from you too.

      Delete
  2. Swarupa,

    What a thought and art ...superb !!!

    Anand and Archana

    ReplyDelete