काल अचानक मोटरमनचा संप झाल्यामुळे नेहमी सांताक्रूझ स्टेशनपर्यंत ट्रेनने येणारी मी बसने आले. मालाड हायवेवरून सांताक्रूझपर्यंत येत असताना, विशेषतः गोरेगाव,जोगेश्वरी या पट्ट्यात सुंदर आणि घनदाट अशा हिरवाईचे दर्शन झाले आणि श्रावण सुरु झाल्याचे प्रकर्षाने जाणवले.
सांताक्रुझला आल्यानंतर संपामुळे रस्त्यावर ट्राफिक तर जॅम झाला झाला होताच, शिवाय एकही रिक्षा रिकामी सापडत नव्हता , खूप आट्यापिट्ट्यानंतर एक रिक्षा मिळाला .घरी येऊन चहा घेऊन भागवतांनी दिलेली मेहंदी हसनची सी.डी. लावली. त्यातल्या मातब्बर गायकांनी गायलेल्या चीजा, वाद्यसंगीत ऐकून मला खूपच छान वाटलं. थकवा कुठल्याकुठे पळून गेला. मन शांत झालं.
दुसऱ्या आणि नेमक्या शब्दात सांगायचं म्हणजे माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या .
So special thanks to Sanjay Bhagwat.
सुनीता
Nice Title and the experience too. Mehdi Hasan's CD is really good.
ReplyDelete