Thursday, July 12, 2012


     
आमच्या सोसायटीच्या आवारात आम्ही कृष्णकमळचे वेल लावले होते. अशोकन झाडाच्या बाजूला लावलेले वेल एक गिरकी घेत झाडाच्या आधाराने वाढत होते. त्याला रोज न्याहाळत आम्ही आनंद घेत होते. आमच्या सोसायटीच्या आवारातील कचरा साफ करण्याचे काम भरत नावाचा मुलगा नित्यनियमाने करतो. एकदा असेच कचरा साफ करताना त्याच्या हातून कृष्णकमळचे वेल नकळत उपटल्या गेले. त्यावेळी मी बाल्कनीत उभी होते. डोळ्यासमोर आपण लावलेल्या वेलीची ही स्थिती बघवली नाही. त्याला मोठ्याने सांगे पर्यन्त वेल मुळासकट उपटल्या गेले होते. त्या क्षणी फार वाईट वाटले. ही नाराजगी अर्थात भरतला न सांगता समजली. वरती येऊन त्याने क्षमा पण मागीतली. नंतर काही काळ गेला .
या घटनेबद्दल भरतलाही खूप वाईट असेल. त्याचाही मनात या बद्दल दु:ख असावे.
काही दिवसा नंतर, एकदा सकाळी सहज बाल्कनीत झाडे पाहताना एक नवीन कुंडी दिसली. तेव्हा ऋतुजा म्हणाली, ‘काल भरतने ही कुंडी दिली, त्यात पांढऱ्या लिलीचे कंद आहेत. किती छान आहे ना, हे झाड !’ क्षणभर नजरेसमोर भारतचा चेहरा तरळला. माझ्यापेक्षा त्यालाच वेलीचे दु:ख जास्त झाले होते आणि आपल्या परीने त्याने त्यातून सुंदर मार्ग काढला. त्याचा या कृतीने मी भारावून गेली. आजच, त्या लिलीच्या झाडावर एक सुंदर फुल उमलले आहे.
जयश्री

2 comments:

  1. Very touching experience! Very well expressed.

    ReplyDelete
  2. This shows that if we express our feelings properly in return we always get good things....This incident reminded me that Om Vaknalli has give all children one Green "Kamalh" which grows in water.When I kept it in Balcony it was growing very well & it multipled in nos.. I was very happy to see it every day.But soon nearby crows had eaten all those.Again I took new one from Shantala but unfortunately this also eaten by birds.But now I have inspired again to see efforts of all for growing Plants, i will again start it when I will be back in Mumbai.

    Sandhya

    ReplyDelete