Sunday, July 8, 2012


जयंत सहस्त्रबुद्धे हे विकासचे लहानपनपासूनचे मित्र. जयंत सहस्त्रबुद्धे संघाचे प्रचारक. ते भारतभर फिरून संघाचे काम करतात. ते गोव्यात संघाचे काम करण्यासाठी गेले असताना त्यांची गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची चांगली मैत्री झाली. ते आले कि संघाच्या, राजकारणाबद्दल, व्यक्तिगत गप्पा होतात. त्या गप्पा उन्मेषच्या कानावर पडतात .
 पाचं- सहा दिवसांपूर्वी आमच्याकडे जयंत सहस्त्रबुद्धे जेवायला आले होते.  त्यांच्याशी बोलायला शुभदा व मिलिंदसर आले होते. मिलिंदसर जयंतदादांचे मित्र. शुभदाला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची थोडक्यात माहिती हवी होती. ती ऐकताना हे लक्षात आले कि  सहस्त्रबुद्धे त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयतेने बोलत होते. ते मुख्यमंत्री असताना शासकीय सुविधा स्वतः साठी न वापरता फक्त कामापुरत्या वापरत असत. ते घरगुती कामासाठी  स्वतःची गाडी चालवत असत. मुलाला शाळेत सोडण्यासाठी ते स्वतःच्या खासगी गाडीने जात. त्यांचा हा साधेपणा ऐकून मला आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी स्वतःच्या पदाचा फायदा घेतला नाही. त्यांची बायको कधीच राजकारणात आली नाही. नेहमी राजकारणापासून लांब राही. कारण घरातील स्त्री राजकारणात उतरली कि घराच घरपण निघून जात. अशा समजुतीच्या त्या होत्या. ह्या माणसाची राजकारणातील तत्त्वे व निष्ठा ऐकून मनात असा विचार आला कि असा मुख्यमंत्री असणे विरळाच.
 पावसाच्या रिमझिम सरींबरोबर खमंग कांदा भजी खातखात आमच्या गप्पा रंगल्या होत्या. हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. 
                विशाखा परांजपे    

1 comment:

  1. विशाखाने आमचे चांगले आदरातिथ्य केलेच पण विशष म्हणजे ती कायम स्वयंपाकघरात न अडकता, जयंत सहत्राबुध्ध्ये यांचे म्हणणे ऐकायला बसली. आम्ही सर्वजण परीकारांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू ऐकत बसलो. मला त्यांची मुलाखत एका जाहीर कार्यक्रमात घ्यायची होती. परिकर मला आधी भेटू शकणार नव्हते. त्यामुळे मला टेन्शन होते. पण जयंत सहत्रबुध्ध्ये यांच्याशी बोलल्यावर पर्रीकर समजले. So nice of Vikas-Vishakha to arrange such informal homely program! Unmesh and Mallika also could understand the better side of politics and leadership. Such examples may inspire them.
    shubhada

    ReplyDelete