Sudhanshu's Post :
|| श्री गुरवे नम: ||
नातं
रविवारी (८ जुलै) सुट्टी असल्यामुळे महत्त्वाची बरीच कामं करायची असं ठरवलं होतं. पण त्या दिवशी मात्र एकही काम होत नव्हतं, प्रत्येक कामात अडचणी येत होत्या. बरीच धावाधावही करावी लागली. त्यामुळे अगदी थकून, वैतागून गेलो होतो. शरीराने थकलेलो आणि मनाने अस्वस्थ, अशा स्थितीत दुपारी घरी येऊन, न जेवताच झोपून गेलो.
थोड्या वेळाने झोपेतून उठलो. विश्रांतीमुळे शारीरिक थकवा तर पळाला होता, पण मनात खळबळ होतीच. अस्वस्थपणामुळे माझी चिडचिड होऊन स्वानंदीच्या आणि मोक्षदाच्या अभ्यासात व्यत्यय आला असता. म्हणून घराबाहेर पडायचं असं ठरवलं. तेवढ्यात एक सुचलं आणि स्वादींना फोन केला. ते सर्व जण घरीच होते. मी त्याच्या घरी गेलो. खूप दिवसांनी शुभमला आणि कृत्तिकाला भेटलो. सर्वांशी मस्त गप्पा मारल्या (फेडररची मॅच बघत). झकास कॉफी प्यायलो, ओरिगामीचा ‘हार्ट पेज-कॉर्नर’ बनवला आणि थोड्या वेळाने घरी निघालो. तासाभराच्या त्या गप्पांमुळे घरी जाईपर्यंत मन शांत झालं होतं.
सुधांशु.
No comments:
Post a Comment