काल " विश्वकोष लोकार्पण सोहळा "चेबूर शाळेत पार पडला, त्यासाठी दिग्गज व्यक्तीची भेट झाली, असे वाटले शिबीरातील सगळे असते तर किती चांगले झाले असते ,त्या व्यक्ती आहेत ,डॉक्टर रघूनाथ माशेलकर ,डॉक्टर विजया वाड . तर्कतीर्थ लक्षमन शास्त्री जोशी यांच्या कन्या श्रीमती अरुंधती आजी ,1960 साली (वाई) येथे लक्षुमन शास्त्री यांनी विश्वकोष लिहिण्यास सुरवात केली, डॉक्टर वाड यांनी तो पूर्णास नेला ,घरा घरात विश्वकोष पोहचावा हा ध्यास पूर्ण झाला, संगणकामार्फत तो पोहचला, डॉक्टर माशेलकर यांचे भाषणाचे मुदेय 1.विश्वकोष अनेक देशात पोहचला हे चांगले झाले ,त्यात सतत नवीन भर पडत गेली पाहिजे ऊ.दा .दैव कण याचा नुकताच शोध लागला आहे , तो सुद्धा विश्वकोशात लगेच समाविष्ट होणे आवश्यक आहे .2. सध्याचे युग दृष्य ,श्राव्य ,चे आहे सगळ्यांना तो विश्वकोष बघायला ऐकायला मिळाला तर नवीन पिढी जास्त अनानदी होईल .3.भारताला हळदीचे हक्क कसे मिळाले त्या बदल गोष्ट सांगितली ,एकदा सगळे घरातील व्यक्ती गच्चीत बसले असताना एक पक्षी खाली पडला त्याचा पंख दुखावला गेला होता ,,त्याच्या आईने लगेच हळदीचा लेप लावला ,पण पक्षी जास्त जखमी झाल्याने नंतर पक्षास उडता आले नाही ,दुसर्या दिवशी ,डॉक्टरांनी इंग्रजी वृतापत्रात हळदीचा मालकी हक्क अमेरिकने दाखवला असे आले .डॉक्टरांना खूप वाईट वाटले, जे माझ्या आजीपासून सगळ्यान माहित आहे त्यावर अमेरिकेने हक्क दाखवला हे पटले नाही ,त्या वेळेस त्यांच्या हातात अधिकार होते ,वेदातील पुरावे, काही प्रयोगाचे निष्कर्ष ,सध्याचे हळदीचे गुण असे सादर केले ,सरकारने खूप पाधीमबा दिला आणि हळदीची ,बासमती तांदूळ,कडू निबाची लढाई जिकली ,इथेच थांबायचे नाही, पुढे कधी परत अशी वेळ आली तर असे नियम केले कि परत भारताला कोणत्याही भारतीय गोष्टीसाठी लढावे लागणार नाही, अमेरिका ज्या पद्धतीने वस्तूच्य मालकी हक्कासाठी माहिती काढते तशी माहिती आपण संगणकात साठून न ठेवल्याने आपल्याला लढावे लागते ,म्हणून विश्वकोशाचे महत्व आहे ,असे त्यांनी सांगितले , माझा दिवस खर्या अर्थाने ज्ञान जोती च्या सहवासात असल्याने सार्थकी लागला,
Thank you Mokshada for sharing this. This reminds me of Majestik Gappa 2 years back, where Kumar Ketkar had interviewed Mashelkar.
ReplyDelete-shubhada