Wednesday, July 18, 2012

Deep-Poojan



आज दिव्यांची पूजा करायची म्हणून दोन दिवसांपूर्वीच आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाईकडून सर्व दिवे (जे महेशच्या आईने अनेक वर्षांपासून जपून वापरले) घासून लखलखीत केले. दिवे पुसून तेलवात फक्त मी करणार होते पण खर कष्टाचं काम त्या बाईने केलं होते.तिच्या घरात अशी पूजा वगैरे काहीही होणार नव्हती. पूजेसाठी आम्ही तिघे मनाची , प्रकाशाची प्रार्थना तसेच आपल्या शिबिरातली दिवेलागणीला म्हणायची प्रार्थना (ज्याच्या घरी अंधार असेल...) आणि मग 'दीप से दीप जलाये ...' म्हणणार होतो. त्यातल्या ओळी  मनात आल्या  आणि मन त्या बाईबद्दलच्या  विचारांनी थोडसं बेचैन झालं.

"अवती भवती प्रकाश असायला हवा असेल तर दीप तेवता ठेवायलाच लागतो.आपल्या विविध पूजांमधून  वापरलेली प्रतिक अतिशय सुंदर आहेत.आध्यात्मिक दृष्टीने अंधार म्हणजे आपल्या मनातील अज्ञान आणि प्रकाश म्हणजे आत्मज्ञानाचा  प्रकाश. त्याचं प्रतीक म्हणून आपण करायचं असतं दीप-प्रज्वलन. मनातलं जे हे ज्ञान असतं त्याला 'अंतरीचा ज्ञानदीप' म्हणतात.'मन स्वच्छ करा,त्यात प्रेमाची स्नेह्ज्योत तेवती ठेवा',असं  मनालाच बजावणारी ही आपली दिव्यांची पूजा." .......पूजा करायच्या आधी व नंतर (एकत्र बसून) लताआजींच्या पुस्तकातला दीपपूजनाचा भाग वाचला. त्यातीलच वरील मौल्यवान वाक्यांनी मनातल्या विचारांना वेग दिल्यासारखा वाटला.


या घरकाम करणाऱ्या बायका फक्त संसाराचा गाडा कसाबसा ओढण्यातच कायम अडकलेल्या असतात. स्वतःची  काळजी घेण हा भागच बहुतांशी त्यांच्या आयुष्यात नसतो.आज अनेक घरी पावसा-पाण्यात काम करणाऱ्या ,परिस्थितीशी  दोन हात करणाऱ्या स्त्रियांमधली  ही एक; बाहेरची कामं उरकून परत स्वतःच्या घरी टिकल्या बनविण्याचं काम करणारी.मागील काही वर्षांपासून तिच्यामुळे माझ्या घरचे दिवे उजळले गेले. पण मी काय केलं ??  दिवाळीची साडी वगळता नेहमी तिच्या कुटुंबासाठीच काही न काही दिलं जाते. पण फक्त तिच्यासाठी म्हणून काही केलेलं नाही.पण काही लहान-लहान गोष्टी तरी मी नक्कीच करू शकते.

' लताआजी  त्यांच्या अमेरिकेतील मैत्रिणीनी नेहमीच पाठवलेल्या केशराचा वापर शिबिरातील आपल्या मुलांच्या शिऱ्यासाठी करत आल्या आहेत.'  - हाच आदर्श समोर ठेवून सुचित्राने अतिशय प्रेमाने आणलेल्या गरम मसाल्याच्या जिन्नसांनी मी चहा मसाला केला.तो त्या बाईला पावसाळ्यात तिला वारंवार होणाऱ्या सर्दीला मारक ठरावा म्हणून दिला.(तो चहा तिला आवडतो),तसेच पावसा-पाण्यात होणाऱ्या तिच्या पायांच्या भेगांसाठी व अनेक वर्ष काम करून रूक्ष झालेल्या तिच्या हातांसाठी क्रीम्स दिली.                             त्याचप्रमाणे सकाळी दुसरी एक बाई भाजी चिरून द्यायला येते. ती सकाळी लवकर घर सोडते म्हणून चहाबरोबरच त्या वेळेत लागणारा माहितीवजा गाणी असा गप्पांचा मराठी कार्यक्रम मी लावते; जेणे करून तिला थोडं relax वाटावं.  प्रत्येक वेळी  मी गजरे आणताना(जसे आधी महेशच्या आईसाठी आणत असे) तिच्यासाठी आवर्जून घेऊन येते आणि ती तो आवडीने घालते सुद्धा.
आपण प्रत्येक जण अश्या गोष्टी करत असतो; पण.... खेदाचा भाग असा की स्वतःच्या  मनातला दिवा तेवायला सोडाच पण थोडासा उजळायला सुद्धा किती वर्ष जावी लागतात. 

5 comments:

  1. A really touching act,Swarupa.I think there is a lot to learn from you. Thank you for sharing this.
    -Swati

    ReplyDelete
  2. Dear Swati, As per Lataaaji's guidence,This is a proess of learning where we all try to become a better person everyday...We all are really fortunate to have this healthy group where we can learn from each other many things.

    ReplyDelete
  3. sundar , i also done pooja with pancharti and i prepaired kankeche sweet dive ,

    ReplyDelete
  4. So beautiful.. your thoughts and action!!

    ReplyDelete
  5. Swarupa,

    Actually after your post I had to write some thing funny......since your post was very comprehensive and beautiful....

    anand and archana

    ReplyDelete