Saturday, July 7, 2012

माझा एक सुन्दर अनुभव

मित्रानो,

मला आणि मुलाना शिबिरात येउन आठ वर्षे झाली आणि सगळ्यानि खुप छान आम्हाला सामावून घेतले आणि म्हणून आम्हाला कधीच एकटेपण जाणवले नाही पण खुप मोठा भावनिक आधार आम्हाला होता।
जेव्हा जयंत ने शिबिरात यायला चालू केले तेव्हा त्याला तुम्हा सगळ्या कडून भव्य वेलकम मिळाले जे आजही आम्ही आठवून गहिवरतो।
आमच्या लग्नाला जेव्हा एक वर्ष झाले तेव्हा स्वरुपाने खुपच सुन्दर फोटो फ्रेम जी गुलमोहोर आणि बोगनवेल याच्या पाकळ्या वापरून केली होती ती भेट दिली आणि त्याबरोबर महेश आणि स्वरुपाने लिहिलेले एक पत्र ही होते। जेव्हा आम्ही दोघानी ते पत्र वाचले तेव्हा आमच्या कड़े शब्द नव्हते आणि डोळे पाण्यानी भरलेले आणि मन शिबिराताल्या प्रत्येक व्यक्ति बद्दल कृत्द्न्यतेने भरून गेले।
त्या पत्रात स्वरुपाने, अँधेरी मधे पाहिलेल्या गुल्मोहोराच्या मोठ्या बहरलेल्या वृक्षावर बोगंवेलाचा वेल पसरलेला पाहिला। ते दृश्य इतके सुन्दर होते की ते आठवणीत रहावे म्हणून ती तिथे जायची आणि ते झाड़ पहायची।
त्या नंतरचे तिचे पत्रातले शब्द मी तसेच लिहून काढ़ते।
" आजपर्यंत तसे निसर्गरम्य चित्र कुठे ही पहायला मिळाले नाही। आता विचार केल्या वर काही गोष्टींबद्दल कुतूहल वाटते, असे वाटतय की एवढा मोठा वृक्ष ऐटित उभा होता, अनेकाना त्याने आपल्या अंगा खांद्यावर आश्रय दिला असेल, त्याने त्या वेलीला प्रेमाने जवळ केले, इतका आधार दिला की ती वेलही जोमाने वाढली आणि त्याच्या बरोबरीने टोकापर्यंत पोहोचली। यातून एक सुन्दर सहजिवनाचा अनुभव येतो असेही जाणवले। दोन वेगळ्या भिन्न जात-कुळीतिल जीव इतक प्रसन्न दृश्य निर्माण करून प्रेमाचा आभास देतात। आज तुम्ही दोघांकडे बघताना, तुम्ही कष्ट घेउन फुलविलेल्या संसाराला पहाताना ते अप्रतिम दृश्य डोळ्यांसमोर उभे राहिले।"

हा अनुभव इतका सुन्दर आहे की मला ते पत्र वेळोवेळी आठवण करून देते की किती आज पर्यंत आम्हाला कसे प्रत्येकाने आदराने सामावून घेतले आहे। आम्ही दोघे ही आता इतराना असे सुन्दर अनुभव आमच्या कडून यावेत असा मनापासून प्रयत्न चालू केला आहे।

मेघना.

No comments:

Post a Comment