दिनांक १/७/२०१२ ला मी, माझे बाबा, चिटणीस काका आणि सानिया असे आम्ही चौघेजण बोरिवलीच्या संजय गांधी national पार्कमद्ध्ये गेलो होतो. खरे तर आम्ही तिकडे जाऊन सायकलने फिरणार होतो. पण आम्ही तिकडे गेलो तेव्हा तिकडे फक्त दोनच सायकली शिल्लक होत्या. आणि सायकल घेण्यासाठी ही मोठी लाईन होती. त्या लाईनच्या पाठी जर आम्ही उभे राहिलो असतो तर आम्हाला नक्कीच चौघांना सायकल मिळेपर्यंत परत यायची वेळ झाली असती. म्हणून आम्ही आमच्या गाडीनेच जंगलात फिरलो. आम्हाला जाताना काही दिसले नाही. म्हणून आम्ही एका मोकळ्या groundवर गाडी पार्क केली आणि कान्हेरी गुंफाला जाण्यासाठी निघालो. जेथे आम्ही गाडी पार्क केली होती तिकडन ही जागा अर्ध्या किलोमीटर वर होती.एवढे अंतर आम्ही चालून पार केले. तेथील भरपूर लेणी पहिली . प्रत्येक लेण्याविषयी तिथे काही माहिती लिहिली होती. नंतर आम्ही परत जंगलात प्रवेश केला तर आम्हाला एक तळे लागले. पण तेथे आम्हाला काहीच दिसले नाही.म्हणून आम्ही दाट झाडीत गेलो. आणि खूप चाललो. पण तेथेही आम्हाला काहीच दिसले म्हणून आम्ही परत त्या तलावापाशी आलो. तर आम्हाला ३ गायबगळे दिसले. मी त्यांचे फोटो काढले. त्या तळ्याच्या बाजूला एक छोटे डबक होते. त्या डबक्यात एक खेकडा आणि एक बेडूक एवढेच दिसले. मग आम्ही परत यायला लागलो. आम्हाला कान्हेरी गुंफावर येताना सुद्धा काहीही दिसले नाही. मग आम्ही जेथे गाडी पार्क केली होती तिकडे गेलो. तर आम्हाला एक अविस्मरणीय गोष्ट दिसली ती म्हणजे आमच्या गाडीच्या बाजूलाच एका दुसऱ्या गाडीवर एक माकड आपल्या पिल्लासह चढले होत. मग त्या गाडीतल्या माणसाने त्यांचे अगदी जवळून फोटो काढले. ते माकड थोड्यावेळाने जंगलात पळून गेले.हे दृश्य मी केक खाताखाता पाहत होतो. मग आम्ही गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. येताना आम्हाला लहान असलेले पण तरुण अस एक हरणाच पिल्लू दिसलं. ते आमच्या गाडीच्या समोरून अचानक धावत गेले. आम्ही त्याचा पाठलाग केला. आम्ही त्याचे निरीक्षण करताना आम्हाला असे जाणवले कि, ते हरीण आपल्या कळपातून वेगळे झाले होते, हरवलेले होते. आम्ही त्या हरणाला झाडात गडप होईपर्यंत पाहत होतो. नंतर आम्ही पुढे गेलो तेव्हा आम्हाला एक हरणांचा कळप दिसला. ती हरण सुद्धा कोणालातरी शोधत होती, बेचैन झाली होती . त्यावरन आम्ही असा तर्क काढला कि ह्याच कल्पात ते मगाशी दिसलेले हरीण होते पण त्या वेळी ते गायब असल्याने ते हरीण आणि हा सगळा कळप बेचैन होता.' आम्ही थोडे पुढे गेल्यावर मला एक सापसुरली दिसली. ती दिसल्यावर लगेचच मी बाबांना गाडी थांबवायला सांगितली. आणि मी साप्सुरली शोधण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण सारे व्यर्थ निघाले. ती गवतात लपून बसली होती. मग आम्ही पटापटा घरी जाण्यासाठी निघालो. मिलीन्द्काकाला आणि सानियाला घरी सोडून आम्ही आमच्या घरी परतलो.
आम्ही जंगलात फिरण्यासाठी आलो होतो. पण इतर काही लोक जंगलात फिरण्यासाठी नव्हे तर गोंधळ घालताना आणि कचरा टाकताना पाहून मला त्यांचा राग येत होता.
उन्मेष परांजपे.
खूप छान वृत्तांत लिहिला आहेस. पुढच्या वेळेस आयांना हि
ReplyDeleteबरोबर घेउन जा!
very good ,try to visit now,after rain,keep it up
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteYou have well narrated the half day picnic at Borivali National Park. You seems to enjoy the jungle trail and by nicely describing the whole trail, you share the same joy with all of us. Thanks for each sharing, Unmesh. Keep it up.
ReplyDeleteJayashree Mavshi.