नुकताच घडलेला माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण मी सगळ्यांबरोबर शेअर करत आहे.
नागपंचमी हा सण आपण प्रत्येक जण साजरा करतो. ह्या सणाला शाळांमधून एका सर्पमित्राला बोलावतात. तो येवून सापांची माहिती सांगतो. साप कसे हाताळावेत? सापांच्या जाती कोणत्या? साप हाताळताना कोणती काळजी घ्यावी? ते ऐकून व बघून मुलं खुष होऊन टाळ्या वाजवतात.
उन्मेषच्या शाळेत मात्र वेगळाच अनुभव आला. सर्व शिक्षकांना माहित होते कि त्याला जंगलातील प्राण्यांची, सापांची खूप आवड आहे. शाळेत गेल्यावर शिक्षकांनी उन्मेषला व त्याच्या बरोबर दोन मुलांना सांगितले कि तुम्ही सापांची माहिती इतर मुलांना सांगा. मग काय उन्मेष खुषच झाला. त्याने नेटवरून सापांचे फोटो गोळा केले व भारतीय साप या पुस्तकातून सापांची माहिती गोळा केली. विशेष म्हणजे या तिघांना त्या दिवशी वर्गात तासाला न बसण्याची मुभा देण्यात आली.
दुपारी ३ वाजता सापाचे फोटो व माहिती मुलांना दाखवावी असे सांगितले होते. त्याप्रमाणे उन्मेषने सर्व सापांची फोटोप्रमाणे माहिती सागितली. सापांची माहिती अगदी अचूक शब्दात मी मुलांना सांगितली, हे त्याने संध्याकाळी घरी आल्यावर अगदी उड्या मारत आनंदी चेहऱ्याने मला सांगितले . ह्या गोष्टिचा आम्हा दोघांना खूप आनंद झाला.
दुसऱ्या दिवशी मी शाळेत फी भरण्यानिमित्त गेले असताना उन्मेषच्या रावतेबाई, मिलिंदसरांनी त्याचे खूप कौतुक केले. ह्या गोष्टिचा मला खूप आनंद झाला. कारण चारचौघात कधीही न बोलणारा माझा मुलगा त्यादिवशी खूप भरभरून बोलला होता.
असा आमच्या शाळेचा हा छोटा सर्पमित्र!
उन्मेषची आवड व छंद ओळखून त्याला योग्यवेळी योग्य संधी देणाऱ्या सर्व शिक्षकांना मनोमन धन्यवाद.
विशाखा परांजपे

Dear Vishakha, Vikas & Unmesh,
ReplyDeleteHardik abhinandan!! Unmesh,we are also interested to see your presentation.
Sandhya
dear vikas, vishakha,
ReplyDeleteyou are nurturing his liking very well. so also his school. good that he got the opportunity and he made best of it. keep it up, unmesh. do show us the presentation. we will love to see. i do not understand anything about snakes. do explain me.
shubhada
Dear Unmesh,
ReplyDeleteYou are nicely developing your passion into hobby. Even we are interested in knowing more about‘Snakes’
Jayashree Mavshi