माझा ब्लोगवरती सहभाग् गेल्या काही दिवसात न झाल्यामुळे क्षमस्व .
गेल्या आठवड्याच्या शनिवार पासून मी व माझे शाळेचे मित्र एकत्र एका वृद्धाश्रमात जायला सुरु केले आहे . आमच्या शाळेत 8वी पासून समाजशिक्षण (social Learning) म्हणून एक नवीन विषय आहे ज्यात मुलांना आपल्या आजुबाजूच्या समाजासाठी काहीतरी करायचे असते . शिक्षिकांनी आम्हाला असे सुचवले कि ह्या वर्षी प्रत्येकांनी स्वतःला जे समाज कार्य करावेसे वाटते ते निवडून करायला प्रारंभ करावे .
काही मुलांनी आपल्या परिसरातला कचरा साफ करायला सुरुवात केली , काहींनी रस्त्यावरच्या कुत्र्यांची मदत करायच ठरवलं ,तर काहींनी गरीब व अपंग मुलांची मदत करायच ठरवलं . आम्ही 3 जणानी मात्र वृद्ध गृहस्तांची मदत करायचा निष्चय केला . माझ्या मनात सुरु करायच्या आधी हा विचार आला की त्या वृद्धाना सर्वात जास्त गरज आहे जिव्हाळ्याची व नातवंडांच्या प्रेमाची , म्हणून आम्ही त्यांच्याशी नुसतच गप्पा मारायचा विचार केला .
तिथे पोहोचल्या बरोबर तिथल्या SISTERS नी आमचं आदरातीथ्य केल . पुढचे अडीच तास कसे गेले ते कळलंच नाही .आम्ही थोड्या आजी -आजोबाना जेवण वाढल , भरवल , त्यांच्या साठी गाणी म्हंटली , इ . त्यांना अगदी त्यांचीच नातवंड व मला माझेच आजोबा आजी मिळाल्याचा भास झाला . आमच्याशी बोलताना ते आणखीन आणखीन open out झाल्याच मला जाणवलं . कितीतरी काळानी त्यांना आपलसं कोणीतरी मिळाल असावं . त्यात थोड्या जणांना तर बरेच छंद सुद्धा होते , मग त्यानी आम्हाला शिकवायचं कबूल केलं . प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणांनी इथे आले होते . एक एकाची कहाणी ऐकून मन भारावून जायचं . पण हे नाते जोडण्याचे प्रयत्न सफळ झाले . त्यांना ही ह्या गप्पा मारण्याच्या कृतीमुळे अस वाटेल कि ते एकटे नाही पडले आहेत . हा कार्यक्रम आता वर्षभर आम्ही चालू ठेवणार आहोत . ह्या आधी असा अनुभव कधीच घेतला नव्हता .

This comment has been removed by the author.
ReplyDeleteहि गोष्ट खूप चांगली आहे. मलापण असेच काहीतरी समाजकार्य करायला मनापासून आवडेल. तिकडे जाऊन त्यांच्याशीच गप्पा मारताना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराची माहिती मी जाणून घेईन.
ReplyDeleteVery noble gesture Om. You should keep up the good work.
ReplyDeleteGod bless.
Jayant.
very admirable project done by very sensible person.
ReplyDeleteAparna.
vey good om ,
Delete