एक अनुभव
मागील आठवडयात
माझे ऑफिस वरळी येथे स्थलांतरीत झाले. त्यावेळी वैयक्तिक नातेसंबंधातून आलेला अनुभव. आमच्या संपूर्ण ऑफिस इमारतीमध्ये कुठलेही अवजड सामान हलविण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी कामगार आहेत. त्यांना आम्ही आमचे सामान बांधलेले गठठे उचलण्यासाठी त्यावेळी बोलाविले होते.
लिफट जवळ
सामान ठेवण्यासाठी जो एक कामगार मदतीसाठी होता, त्याने तेवढयात तिथून चहा घेउन जाणाऱया आमच्या चहावाल्याला आवाज दिला, ’अरे, संजय, आमच्या मॅडमसाठी एक गरमागरम कॉफी घेउन ये, आणि बिना शक्कर ’ मला धक्काच बसला. मी विचारले, ‘तुम्ही माझ्यासाठी का कॉफी सांगितली’? उलट आमचा या ऑफिसमधील शेवटचा दिवस असल्यामुळे आज माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना चहापाणी आहे.
त्यावर त्याने
दिलेल्या उत्तराने माझे मन हेलावले. तो म्हणाला, तुम्ही आम्हाला आतापर्यंत कामाव्यतिरिक्त इतक्यावेळा चहा दिला आहे, तर आता जाताना तरी मला तुम्हाला काही देऊ दे. मला माहित आहे तुम्ही चहा घेतनाही व तुम्हाला बिनसाखरेची
कॉफी आवडते. मी यावर पुढे काहीच बोलू शकले
नाही.
लक्षात ठेवून
आभार मानण्याची सोपी पण मनाला भिडणारी एका साध्या कामगाराची अशीही कृती पाहून मी भारावून गेले.
No comments:
Post a Comment