Tuesday, July 24, 2012

नागपंचमी

नागपंचमीला आम्ही  clayच्या नागाची पूजा केली.   आमच्याकडे या दिवशी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य असतो. मी व ओमने मोदक बनवले.(आधी काही वेळा   प्रयत्न केल्यामुळे ओमला मोदक बनवणे आता  तितके अवघड वाटत नाही.)  गच्चीवरच्या हळदीच्या पानांनी त्यांना सुवासिक केलं. शिबिरात मोदक केले होते त्याची आठवण झाली.'मोदक वळताना तांदुळाची पिठी वापरल्यास उकड हाताला चिकटत नाही.' ही  लताआजींनी त्या वेळी दिलेली टीप त्यानंतर प्रत्येक वेळी मोदक वळताना लक्ष्यात ठेवली. त्याचप्रमाणे माझ्या आजोबांची ही आठवण झाली. ते खूप मोठ्ठे-मोठ्ठे (21 मुखऱ्या असलेले) मोदक बनवत असत. मला अजूनही अनेकदा प्रयत्न करून सुध्दा 18-19 मुखऱ्याच पाडता आल्या आहेत.

"हळदीची पाने कुणाला हवी असल्यास त्यांनी आमच्या घरी येउन घेवून जावी;म्हणजे त्या निमित्ताने तुम्ही आमच्या घरी याल." अशी ओमने केलेली विनंती आहे. "पाने नको असली तरी  तुम्हाला आमच्या घरी readymade मोदक सुद्धा बनवून मिळतील. व  त्यावर तुपाची धार ही मिळेल." हे माझ्याकडून दाखविलेले आमिष आहे.  काय?तोंडाला पाणी सुटलं ना ?


So....Hurry up!!! Limited stock of leaves!

No comments:

Post a Comment