नूलकर यांचे पोस्ट
1
आजीनी आपल्याला घ्ररात आपल्या मदतीला येणाऱया व्यक्तीसाठी काहितरी करा असे सांगितले होते. तेव्हाच आम्ही संगिताला (आमच्या घरातली मदतनीस) तुझ्या घरी जाऊन तुम्हाला काय कार्यक्रम करण्यास आवडेल ह्यावर चर्चा करून सांगा. त्याप्रमाणे त्यांनी दोन तीन जागा सुचवल्या. त्यातील राणीची बाग सर्वांच्या मतानुसार ठरली. आम्ही 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्ताने नूलकर व सोनावणे परिवार एकत्र गेलो. कोणी एकटे पडणार नाही याची काळजी आम्ही घेतली. जेवणाची वेळ झाल्यावर छानश्या हॉटेलमधे त्यांच्या आवडीनूसार जेवण घेतले व थंडगार आईसक्रीम खाऊन घरी परतलो. त्यानंतर लक्षात आले, वर्षातून दोन तीन वेळा त्यांच्याबरोबर बाहेर गेलो तर नक्कीच दोघांना आनंद वाटेल. त्यांना सहज वाटावे असे आम्ही राहण्याचा प्रयत्न केला.
2
आपल्या जीवनात अनेक अशा व्यक्ती असतात त्या सतत आपल्या सेवेकरता तत्पर असतात. उदा. भाजीवाले, शिंपी, दळणवाले, दूधवाले, कचरा उचलून नेणारे, पोस्टमन, टेलिफोनवाले, सार्वजनिक रस्ता स्वच्छ करणारे, टेलिफोनवाले. दरवर्षी दिवाळीत आपण कचरा उचलणारे, घरातील मदतनीस यांना दिवाळीचा फराळ देतो. ह्यावर्षीपासून वरील सर्व व्यक्तीना फराळ दिला त्याचबरोबर एका आजीना त्यांना हवा तसा चहा पाव देताना मनापासून छान वाटले.
3
आम्ही 11 मेला फणसाडच्या जंगलात गेलो होतो. तेथे शांभवी ही सर्वांत लहान. जंगलात फिरण्याची किंवा खूप चालण्याची सवय नाही पण तिचे खरोख्रर कौतूक करावे इतकी शांतपणे ती जंगलात फिरली. फिरताना कोणत्याही प्रकारची कुरकूर केली नाही. कडेवर घ्यायचा हट्ट केला नाही.
स्वानंदी अनघाचे पण कौतूक करावे कारण त्यांनी पण तिला छान पद्धतीने लहान बहिणी ह्यानात्याने सांभाळले व तिची काळजी घेतली. स्वत:च्या गप्पांमधे सामाऊन घेतले.
good social commitment
ReplyDeletekhache