Saturday, June 16, 2012

Satsangi shibirvasi


सर्व सत्संगी शिबीरवासीयांनो,
नमस्कार,
बहुतेक सर्वांनीच शिबीरातील कमी असलेल्या योगदानाबद्दल लिहिले.
बहूतेकांनी आपल्या त्रूटी प्रांजळपणे मांडल्या. सर्व साधारणतः सगळ्यांच्या त्रूटी खालिलप्रमाणे आहेत.
1.     वैचारिक आळस
2.     आपण व आपले कुटूंब हाच मूख्य फोकस
3.     आजची गोष्ट उद्यावर ढकलायची वृत्ती
4.      एकमेकांशी कामाशिवाय नसलेला संपर्क
5.     वेळ नाही ही सबब
6.     इतर पालकांशी गोड-गोड संबंधच ठेवायची प्रवृत्ती
7.     चूक होण्याची भिती त्यामुळे पुढाकार टाळण्याकडे कल

हे सर्वांना लागू आहे असा गैरसमज नसावा.
आपला पिंडधर्म काही पूर्णतः बदलू शकत नाही. उदा. Introvert nature
पण सुधारणा तर करू शकतो. एक आणखी मला जाणवलेली गोष्ट म्हणजे आपण बऱयाचदा आपल्या सहज प्रवृत्तीने वागत नाही.
माझ्याबद्दल तुम्हांला मी खूप बोलतो असा समज आहे कारण मी शिबीरात comfortable असतो. याचं कारण काय?
1. लताआजी व काटदरे कुटूंब 2. शिबीरात सहभागी निरपेक्ष पालक आणि मुलं 3. भाग्यश्री आणि मुलांनी सर्वांशी जोडलेले नातेसंबंध 4. सुरुवातीलाच लक्षात आलेली बाब की शिबीर मुलांसाठी नसून आपल्यासाठी आहे.
तरीही सर्वांशी मैत्रीचे संबंध का नाहीत?
कारण Lack of communication. घरातही व बाहेरही. यात बदल करणं आवश्यक आहे हे कळतं पण वळतं नाही. आतापर्यंत सर्व शिबीरातील नातेसंबंध भाग्यश्री व मुलांनी जोपासले आहेत. माझ्याबाजूने एकच मुद्दा आहे की मी कुठल्याही चांगल्या गोष्टीत अडथळा आणतं नाही व सहभागी होतो.  
मजा म्हणजे ह्या पोस्टची भाषाही फार फॉर्मल झाली आहे. मित्रांशी संवाद असं लिहिता वागता यायला पाहिजे नाहीतर हा पोस्टही निबंधस्पर्धेतील निबंधच वाटतो.
आपल्या लिहिण्या/बोलण्यात/वागण्यात जरा सैलपणा (informal) आला तर आपले सर्वांचे संबंध cordial to friendship या वाटेवर जाऊ शकतील. (विचारात सैलपणा वा थिल्लरपणा अभिप्रेत नाही.)
मला वाटतं एवढं प्रवचन पुरे.
संजय

No comments:

Post a Comment