टेनिस च्या आठवणी
परवाची फ्रेंच ओपेन फाईनल सर्वांनी पहिलीच असेल. राफेल नदाल ने हि match जिंकून पूर्वीच्या (म्हणजे माझ्या लहाणपणीचा) टेनिस प्लेअर बियोन बोर्गचा सलग सहा match जिंकण्याचा रेकॉर्ड तोडला . जोकोविच साठीही ही match अतिशय महत्वाची होती . ही बातमी वाचताना माझे मन भूतकाळात गेले. माझ्या लहाणपणी बीयोन बोर्ग ,जॉन मेकेंरो , जिमी कॉनर्स हे फॉर्म मध्ये असलेले खेळाडू होते. मला त्या वेळेस त्या खेळातील काहीही कळत नव्हते. परंतु जेव्हां match असे तेव्हां मोठ्या भावंडांच्या उत्साह ओसंडून वहात असे. घरातील भिंतींवर त्यांचे मोठे मोठे पोस्टर लावलेले असायचे. त्यांच्या बरोबर मी हि match पहायला बसत असे. बियोन बोर्गचा खेळ पहायला खूप मजा यायची.त्याची केसांची स्टाईल, मनगटाला व डोक्याला बांधलेले band तसेच खेळातील चपळता, अचूकता सर्व पाहण्यासारखे. खेळात आक्रमकता असून सुद्धा चेहऱ्यावर शांत भाव असायचे. इतर खेळाडूंशी तुलना केल्यास त्याला 'आइस बोर्ग ' हे नाव का पडले याची खात्री पटत असे. या बरोबरच त्या काळातील काही players चे खेळ पाहिलेले जसे कि जिमी कॉनर्स, जॉन मेकेनरो, क्रिस एवर्टलॉईड , Gabriella ,सबातिनी, ह्या नंतरचे बोरिस बेकर , मार्टिना, स्टेफी ग्राफ, आंद्रे आगासी, मोनिका सेलेस व अरान्था संचेस वगेरे. ह्या सर्वांचे व्यक्तीमत्व निराळे, स्टाईल निराळी तसेच खेळण्याची पद्धतहि वेगळी. ह्या आठवणी येत असतानाच रेडीयोवर 'आठवणिच्या हिंदोळयावर' या कार्यक्रमात टेनिस च्या इतिहासाची माहिती सांगत होते. मी माझ्या आठवणी कौस्तुभला सांगत असतानाच रेडियो वर हि त्या खेळाडूंची नावे ऐकल्या मुळे त्याला ते खेळाडू कसे होते, हे पाहण्याचे उत्सुकता लागली. आम्ही यु टयूब वर त्यांच्या मेचेस चे video पहिले. ते पाहताना त्याला खूपच मजा आली तसेच मला हि माझ्या बालपणीच्या रम्य आठवणी आपल्या मुलाबरोबर share करता आल्या त्यामुळे खूप छान वाटले.
-स्वाती
छान लिहिले आहेस. तुझ्या मोठ्या भावासारखच माझ् होत. फक्त पोस्टर लावली नव्हती. एक फायनल अनिल आजोबा व शाळेतला अद्वेत अशी ही पाहिली होती. साधारणत: ग्रुपमधे मॅचिस बघितल्या.
ReplyDeleteकारंजे कुटुंबीय फॉर्ममधे अाहेत. Keep it up.
बाबा मला बोर्ग आणि मेकेंरोच्या गोष्टी सांगतात कि ते खेळाडू कसे खेळायचे? त्यात बोर्ग कसा थंड होता. आणि मेकेंरो कसा तापट होता. काही झाले तरी मेकेंरो चिडायचा.म्हणजे जर तो हरला तर तो खूप चिडायचा .आणि जिकला तर एग्डी शर्त काढून नाचायचा. आणि त्याच्या उलट वागणारा खेळाडू म्हणजे बोर्ग.तो हरला तरी थंड राहायचा आणि जिंकला तरी सुद्धा तसाच थंड राहायचा.
ReplyDeleteBoth players were great. Mackanro was typical american. His motto was play 2 win. He was very attacking player. U can say he is one of the pioneer of modern style power tennis. He used to loose temper while playing not after loosing.
ReplyDeleteBorg was european nicnamed iceberg. His style of play was akin to old style of game. Sort of defensive type. Was a baseline player. चिडणे त्याला माहितीच नव्हतं. My comments u can check with your tennis coach.