Tuesday, June 5, 2012

नूलकर


उन्मेषसाठी
जंजिऱयाला जाण्यापूर्वी गार्गीचा संदेश आला होता की मेट्रोजवळ बाओबाब / गोरख चिंचेचे झाड फुलले आहे. सतत 2 वर्षे हा संदेश ती देत होती. मला जाता येत नव्हते. याची मला खंत वाटत होती. यावर्षी चिटणीसांनी जंजिरा येथील गोरख चिंचेचे झाड बघून या असे आग्रहाने सांगितल्यामुळे ते झाड पाहण्यास गेलो. ती फुले फुललेली पाहिली. खूपच आनंद वाटला. ह्याबद्दल गार्गी व चिटणीसांचे आभार. त्यांच्यामुळेच हा आनंद घेता आला. ह्या फणसाडच्या सहलीसाठी चिटणीसांची खूपच मार्गदर्शन केले व मदत केली. त्यामागचे त्यांचे आमच्या सर्वांवरील प्रेम कळले
ह्या गोरख चिंचेच्या फुलाचा फोटो काढण्यासाठी उन्मेषने खूप चांगला प्रयत्न केला जेव्हा त्याने मला कॅमेरातील फूल दाखवले तेव्हा ते बघून खरंच आनंद झाला. त्याला मनापासून दाद दिली. झाड अधर्धे रस्त्यावर दुसरी बाजू खोल होती तरी प्रयत्न करून योग्य फोटो काढला. त्याला समजले की मोक्षदा मावशीला कसा फोटो हवा आहे. कारण तो ब्लॉगवर टाकता येईल व सर्वांना बघता येईल.

1 comment: