Thursday, June 14, 2012

शिबिरासाठी माझे योगदान कमीच राहिले. 
याची तीन कारणे असू शकतात. एकतर अशा समाजामध्ये आपण वाढण्याला किती महत्व आहे ते मी लक्षात घेतले नाही, माझ्यामधली कृतज्ञतेची कमी असलेली जाणीव आणि माझा न वाढवलेला आवाका. 
या समाजात मनापासून सहभागी होणे आणि स्वताला बदलणे ही आपल्या विकासाच्या गाडीची दोन चाके आहेत. यातील एकाच चाकाने पुढे जाण्याचा प्रयत्न अपुराच राहणार हे उघड आहे.
या मागची कारणे शोधताना असे लक्षात आले की बुद्धीला व शरीराला आलेला आळस हेच महत्वाचे कारण त्या मागे आहे. नाहीतर महेश स्वरूपाने केलेले चिंतन आपल्याला करणे अशक्य नव्हते. पण एकदा घसरणीवर उभे असल्यावर 'कृती करण्यात दिरंगाई', 'वेळ पुरत नाही ही सबब' ही उतरंड आलीच. शियाय आपला आवाका वाढला नाही की आपल्याला आपले प्राधान्यक्रम ठरवता येत नाहीत. 
आपल्या आयुष्यात अमुक एक प्रश्न उभा राहणार नाही, असे गृहीत धरून मी चाललो पण तशा संकटाना तोंड द्यायची वेळ आलीच. आणि तेव्हा आपली पूर्वतयारी कमी पडली हे लक्षात आले. या पुढे आपला आवाका वाढवायचा असेल तर शिबिरात सक्रीय होण्याला पर्याय नाही!!  तसे करण्याचे मी व विशाखाने ठरविले आहे. 
विकास 

No comments:

Post a Comment