शिबिरात आम्ही सुमारे ३ वर्षांच्या विरामानंतर आलोय, पण अजिबात परकेपण जाणवत नाही, कारण इथले ऊबदार नातेबंध. लताआजीनी तर अपेक्षेप्रमाणे फारच सहजत: आम्हाला या म्हटलं. मधल्या विरामाच्या काळात अनेकदा शिबिरातील मित्रांनी भरभरून प्रेम दिलं. मार्चमध्ये मी मलेशियाला कामानिमित्त गेले असताना स्वरूपाने मल्लिकासाठी प्रेमाने घरी येऊन तिला आवडता डबा दिला. तिच्या गेल्या वाढदिवसाला संगीताने छान केक स्वतः बनवून आणला होता. सुधान्शुने आम्हाला चाय आणि व्हाय या TIFR च्या कार्यक्रमाशी जोडून दिलं. सुनीताने तिच्या घरी सर्वांबरोबर बोलावलं. विकास-विशाखाशी सतत संपर्क होता- त्यांच्या काही वैयक्तिक प्रश्नावरही आमच्यात चांगलं शेअरिंग होतं. अशी अनेक उदाहरणे देता येतील, ज्यामुळे शिबिराच्या ग्रुपशी आम्ही जोडून राहू शकलो, अर्थात या सर्वांच्या चांगुलपणामुळे आणि जिव्हाळ्यामुळे. एरवी असे बंध विराळा. लताआजीनी दिलेल्या विषयावर ब्लॉग लिहिण्याच्या निमित्ताने शिबिरातील मित्रांचे हे नातेबंध कसे व्यापक आणि समावेशक आहेत, याबद्दल लिहिता आले. नाहीतर हे ऋण शब्दांकित करायचे राहून गेले असते.
शुभदा चौकर
ऋण शब्द टाळा व मिटीगला दोघांनी या.
ReplyDelete