Monday, June 4, 2012

आमची पेंचची सहल

पेंच हे एक अभयारण्य आहे. या अभयारण्याचे वेशिष्टय म्हणजे येथील काळे खडक. हे दगड जागोजागी विखुरलेले असतात. हे जंगल पर्यटकांना पावसाळ्यात बंद असते. आम्ही ह्याच अभयारण्यात 2४ ते २८ मे या दिवशी गेलो होतो.  या जंगलात ४० वाघ आणि ४८ बिबटे आहेत. तसेच येथे भरपूर चितळ, माकड, गवे, साप इ. प्राणी आहेत.  
                       २४ मेची संध्याकाळ आणि २५ मेची सकाळ आम्ही प्रवास केला आणि अखेरीस  २५ मेच्या दुपारी ठीक २:३०   वाजता आम्ही पेंचला  पोचलो. तिकडे पोचल्यावर आम्ही  जेवलो आणि थोडावेळ झोपलो. ३ वाजता उठलो. त्या दिवशी आमचा walking trail होता. तेव्हा आमच्याबरोबर तिकडचा गाईडसुद्धा होता. पहिल्यांदा एक वडाचे व एक बांबूचे झाड दिसले . त्या झाडांची सविस्तर माहिती अनुज दादाने सांगितली. वडाच्या झाडाच्या पारंब्या पूर्णपणे जमिनीत रुतलेल्या होत्या. त्यानंतर आम्हाला खूप वेगवेगळ्या  प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. गाईडने आम्हाला असे सांगितले कि ' एके ठिकाणी  रोज  वाघ येतो' म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. तर आम्हाला फक्त पक्षी दिसले. त्या जागी खूप वेळ बसलो . पण आम्हाला पक्ष्यांशिवाय अजून काहीही दिसले नाही. अर्ध्या तासाने आम्ही परत आलो. येताना सर्वांच्या अंगावर चिलट बसत होती.त्यामुळे फोटो काढणे कठीण झाले होते. तरीपण आम्ही दोनतीन फोटो काढलेच. नंतर आम्ही हॉटेलवर आलो आणि जेवलो.   अनुज  दादाने सांगितले होते "उद्या आपल्याला ४ वाजता उठून सफारीला जायचे आहे."
                       २५ मेला सकळी ४ वाजता उठून सफारीला जाण्यासाठी तयारी केली. आणि ५:३० च्या जीप्सीमधून जंगलात फिरायला गेलो. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला एका माणसाने सांगितले की 'पुढे kill सोबत बिबट्या आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि शोधायला लागलो.  पण आम्हाला काहीकेल्या बिबट्या दिसत नव्हता. एक बाईं आम्हाला सांगत होती की "it is there "  पण आम्हाला तो दिसायला वेळ लागला.  बिबट्या दिसल्यावर आम्ही लगेचच त्याचे फोटो काढले. मग काही वेळानंतर बरोबर बिबट्याच्या समोरच्या बाजूने सांबराच्या call  चा आवाज आला. लगेचच बिबट्याने वर पहिले. मग आम्हाला त्याचे चांगले फोटो काढता आले. मग  तो उठला आणि पळून गेला. त्यावरन आम्ही असा तर्क काढला की त्या बाजूने वाघ येत असावा. कारण समजा दुसरा बिबट्या येत असता तर त्याने नक्कीच झुंज दिली असती. ज्या अर्थी तो पळून गेला त्या अर्थी वाघच येत असावा. नंतर आम्हाला काहीही दिसले नाही.  ९ वाजता आम्ही परत आलो. आल्यावर जेवलो. आणि थोड्यावेळ पत्ते खेळून झोपलो. मग परत ३:३० वाजता उठलो आणि जंगलात फिरायला गेलो. जाताना काही खास दिसले नाही. परत येताना मी आणि ओमकार एक डुलकी काढत होतो. ओमकारला अचानक वाघ दिसला. त्यामुळे तो उठला. आणि बोलला "वाघ वाघ". वाघ या शब्दाने मी दचकून ताडकन उठलो. आणि आजूबाजूला पहिले तर खरच आमच्या उजव्या बाजूच्या एका खोलगट भागात तो वाघ चालत होता. पण त्याचे फोटो मात्र  काढता आले नाहीत. कारण तो झाडाझाडातून जात होता. म्हणून आम्ही डोळ्यांनी त्याचे दर्शन घेतले. ओमकारच्या कॅमेरामद्ध्ये त्याने काढलेले वाघाचे फोटो आहेत. आमच्याबरोबरच्या इतर २ गाड्यांपैकी एका गाडीला वाघ दिसला नाही. पण त्यांना अस्वल दिसले. दुसऱ्या गाडीला बिबट्या नाही दिसला. मात्र त्यांना रानकुत्रे दिसले. या जंगलात रानकुत्र्यांची संख्या खूप कमी आहे.  असे आम्हाला अनुज दादाने सांगितले. अनुज दादा म्हणजे जणू महेश काकाच. मग आम्ही परत रूमवर आलो. आपण काय काय पहिले ते  दुसऱ्या गाडीच्या माणसाना सांगायचे असा एक कार्यक्रम होता. त्यानंतर  आम्ही जेवलो. आणि झोपलो. 
                          २५ मे सारखच २६ मे ला सकाळी ४ वाजता उठलो. आणि जंगलात फिरायला गेलो. त्या वेळी कोणताही प्राणी पहिला नाही. पण पक्षी मात्र खूप दिसत होते. आम्ही पक्ष्यांना पाहण्याची मज्जा लुटली.. आम्ही एका तलावाच्या काठी गेलो होतो.तेथे आम्हाला खूप पक्षी आणि मोर, माकड, हरण आणि रानडुक्कर इ . दिसले. आणि आम्ही परत हॉटेलवर आलो. जेवून, पत्ते खेळून झोपायला गेलो तेव्हा अचानक कोणीतरी हाक मारली. हॉटेलसमोर साप आणि मुंगुसाची मारामारी चालू होती. ती मी पहिल्यांदाच पाहत होतो. .ती मारामारी पाहून मी एकदम थक्क झालो. परत दुपारी ३ : ३० जंगलात फिरण्यासाठी निघालो. तेव्हा आम्हाला माकड, खूप हरण आणि परत मुंगुस इ. प्राणी दिसले. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला अस्वल दिसले. ते झाडाझाडातून जात होते. त्याचे फोटो आम्हाला काढता आले नाहीत.म्हणून आम्ही ते निरखून पहिले. तो लहान आकाराचा नर होतात्यानंतर आम्हाला काही दिसले नाही. ७ वाजता आम्ही परत हॉटेलवर आलो.  जेवलो आणि अचानक  आदल्या दिवशी सारखाच तो मुलगा आम्हाला सांगायला आला की जवळच एक कोल्हा आला आहे. कोल्हा बघायला धावलो. आम्हाला त्याचे दर्शन चांगल्याप्रकारे झाले. मग आम्ही झोपलो. या संपूर्ण प्रवासात संधी मिळेल तेव्हा आम्ही मुले पत्ते खेळत होतो.  
                         २७ तारखेला रोजच्यासारखे सकाळी ४ वाजता न उठता आम्ही ७ वाजता उठलो आणि walking trail साठी गेलो.  तेव्हा आम्हाला Eagle दिसला. आम्हाला एकूणच या जंगलात  पक्षी खूप दिसले. नंतर आम्ही परत रूमवर आलो. मुंबईला येण्यासाठी सगळ आवरल आणि निघालो. निघताना आम्हाला माकडांची मारामारी बघता आली. या मारामारीत एका माकडाला जबरदस्त जखम झाली होती. 
मग आम्ही नागपूर स्टेशनला गेलो. गाडीत बसलो. आमची गाडी ६:४० ला निघाली. रात्री आम्ही उशिरा झोपलो. पहाटे लवकर उठलो. मनमाडला आम्हाला न्यायला खाच्चेकाका आले होते. त्यांनी आम्हाला दुसऱ्या गाडीने मुंबईला आणले. २८ तारखेला आम्ही सकाळी ठीक ११ वाजता घरी आलो. 

उन्मेष परांजपे 

-- 
Vikas

2 comments:

  1. तू लिहतोस छान. ब्लॉगसोडून एक वही कर आणि मनात येईल ते रोज काहीतरी लिही.

    ReplyDelete
  2. Nicely written, Unmesh. As rightly said by Sanjaykaka start writing regularly. We are eager to read more.
    Bhagyashree

    ReplyDelete