Sunday, June 17, 2012


शिबीराचे महत्व कळून सुध्दा सहभाग न घेण्यामागल जाणवलेली कारणे :

1 लता आजींनी शिकवल्या प्रमाणे उजव्या मेंदूचा प्रयत्नपूर्वक उपयोग न कल्याने विचारशक्तीवर मर्यादा येतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर केलेला विचार योग्य पातळीचा असेल की नाही याची भिती वाटते. त्यामुळे विचार करण्याचे टाळले किंवा पुढे पुढे ढकलले जाते.

2 स्वत:चं जग खूप सीमीत ठेवल्याने बऱयाच गोष्टींचा आवाका येऊन त्यावर विचार करण्यात खूप वेळ जातो व विचार नेमक्या शब्दात मांडता येत नाही व मग जेव्हा आपल्या पैकी कुणीतरी तो मुद्दा मांडतो तेव्हा असे जाणवते की `अरे आपल्याला हेच वाटत होते'

3 आपल्या अनुभवाचा इतर कुणाला देखील उपयोग होऊ शकतो हे लक्षात येत नव्हते

4 लता आजी जे सांगतात ते फक्त आपल्या कुटुंबापुरते काही प्रमाणात करण्याचा स्वभाव

केदार, मृदुला दाणी

No comments:

Post a Comment