Monday, June 11, 2012

OUR INTROSPECTION ON SHIBIR

शिबिराप्रती  कमी पडणारे योगदान या बद्दल विचार करताना वाचनात आलेले एक वाक्य आठवले. -'एकट्याने केली जाते ती तपस्या आणि एकत्रित रित्या अनेकांनी केलेली ती साधना.' हे वाक्य कदाचित ध्यानधारनेशी  निगडीत असू शकेल. परंतु आपल्या शिबिराबद्दल याचा अर्थ लावल्यास आम्हांला असे वाटले की इथे तर 'तपस्या' व 'साधना' या दोन्ही गोष्टींची बरोबरीने गरज आहे. स्वतः मध्ये प्रयत्नपूर्वक करावे लागणारे सकारात्मक बदल (तपस्या) हा पहिला भाग- अतिशय अवघड वाटणारा  आणि या सुंदर समाजात सर्वांची एकत्र वाढ व्हावी यासाठी करावी लागणारी सातत्यपूर्ण धडपड (साधना).


या दोन्ही बाबींमध्ये वैचारिक (अधिक प्रमाणात) व शारिरीक लागणारे कष्ट  हा एक टप्पा आणि  त्यानंतरचा आचरणात आणण्याचा व कायम टिकवण्याचा भाग हा दुसरा टप्पा .


यात अडथळा आणणाऱ्या गोष्टी आपणच निर्माण केल्या आहेत असे वाटते. 1) एक म्हणजे वेळ पुरत नाही ही सबब. 2) गोष्टींच्या सहज उपलब्धतेमुळे आणि दूरदृष्टीचा अभाव असल्यामुळे बुद्धीला व शरीराला आलेला आळस . 3) त्या आळसापोटी कृती करण्यात दिरंगाई. 4) मनातल्या कसल्याशा भीतीमुळे समाजात मोकळ होण्यास वाटणारी अडचण व त्यामुळे निर्माण  झालेली वरवरची नाती. 5) जबाबदारी घ्यावी अशी ईच्छा असली तरी ती कधी,कशी व कुठे घ्यावी याचा मनात असलेला संभ्रम. त्यामुळे आपल्या हातून चुका होतील म्हणून पाऊल पुढे घालताना संकोच. 6) म्हणजेच स्वतःचा न वाढवलेला आवाका.


आपण शिबिरातील पालक  मुलांच्या भविष्यासाठी फक्त त्यांच्या शिक्षणातल्या संधी बघण्यात व बँकेतील ठेवी वाढवण्यात  गर्क नाही आहोत हे नक्की. पण  तरीही पुढील पिढीसाठी फक्त वीज आणि पाणी यांच्या बचतीपर्यंत आपला विचार होतो; ज्यावेळी लता आजींनी  मात्र शिबिरातल्या प्रत्येकाचा( खोलवर )विचार करून अगदी लहानात लहान  म्हणजे वैयक्तिक स्वच्छता, सवयींपासून ते ज्ञानेश्वरीच्या सोप्या,सहज समजेल अश्या अनुवादापर्यंत समजावून सांगताना पुढील पिढीसाठी पालाकांमार्फात आपसूक संस्कारांचं बीज पेरून  दिल आहे. 


आज आजूबाजूच्या समाजात चाललेल्या गोष्टी पाहिल्या तर आपल्या या शिबिराची किंमत अधिकच वाढते. आणि त्या साठी आपण एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवले पाहिजेत  ही आजची व उद्याचीही गरज  आहे असे जाणवते.  


महेश - स्वरुपा
---------------- 

2 comments:

  1. Dear Mahesh-swarupa,
    I agree with you. I realised the hollowness as we were away from shibir for last 2-3 years. It was nice of you all to be very well connected to us, kindly supporting us. We always consider this group as our dear one, though we were bit away from regular meetings. Now we are back again. We are joining the teen-ager shibir now. Thrilled to meet u regularly.
    -shubhada chaukar

    ReplyDelete
  2. महेश स्वरूपाने फार चांगले विचार मांडले आहेत. मला भावलेला आणखी एक भाग म्हणजे त्यांची भाषा फार सुरेख आहे. थेट आणि नेमकी.
    विकास

    ReplyDelete