Monday, June 4, 2012

नवी ओळख

मित्रहो  ,
       साधारणतः एप्रिल -मे मध्ये गुलमोहर फुलायला लागला की मुलांनी शिबिरात काढलेल्या पहिल्या ठशांच्या गुलमोहराची आठवण होते. गुलमोहर,सोनमोहोर,बहावा,कासोड,ताम्हण,कांचन या सर्वांशीच आपली घनिष्ट ओळख झाली ती शिबिरातच.विविध पक्षी,फुलपाखरे आपल्याला आपले सगेसोयरे वाटायला लागले तेही इथेच येऊन,फुलांच्या गंधांशी नातं जडलं तेही इथेच.
        जीवन आनंदानं जगणं म्हणजे काय? जीवा-भावाच सख्य म्हणजे काय ? याचा उलगडाही इथेच झाला .
        आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचे  विविध पैलू उलगडत जाऊन ती उत्तमरीत्या विकसित होत आहेत तीही शिबिरामुळेच.आपला स्वतःचा स्वतःशी परिचय झाला तो ही इथेच.
        एवढया सगळ्या चांगल्या गोष्टी शिबिरामुळेच घडूनही,ते इतकं महत्त्वाचं असूनही माझ्यातल्या काही दोषांमुळे,उणीवांमुळे मनात असूनही माझं शिबारामधल  योगदान  कमी होतेय.कदाचित माझे प्रयत्न कमी पडतायत.
         यापुढे त्या कमतरता नेमक्या ओळखून,त्यावर मात करून,स्वतःची शिबिरातली 'Total  Involvement' मी वाढवणं गरजेचं आहे,हे मी जाणलंय.त्यासाठी कृतियुक्त प्रयत्न महत्त्वाचे.
     सुनिता-विवेक                   

1 comment:

  1. Very rightly and beautifully put in. Sunita, I think even you have a good flair of writing.
    Bhagyashree

    ReplyDelete