काही वर्षांपूर्वी शिबिरात लताआजींनी ज्ञानेश्वरांचा एक 'अभंग' शिकवला होता. त्या वेळी फक्त शिकविलेल्या चालीकडे लक्ष्य देऊन 'एक गाणे' म्हणून तो म्हटला होता . कालच्या पेपरमध्ये त्याच अभंगातील ओळी दिसल्या आणि लक्ष्य वेधले गेले.
'काट्यांच्या अणिवर वसती तीन गाव।
दोन ओसाड,एक वसेचिना।।'.............. आठवलं?
ह्या अभंगाला काही अर्थ सुध्दा असू शकतो असं वाटलं नव्हतं आणि लताआजींनी नक्कीच विचारपूर्वक तो शिकवला असेल ह्याचा विचारही केला नव्हता. पेपरमधल्या लेखात त्याचा अर्थ सांगितला आहे. समजायला थोडासा कठीण आहे. खरंतर ज्ञानेश्वरांनी जीवनाविषयी घातलेलं ते एक कोडं आहे.
(लोकसत्ता -13 जून - पान क्रमांक 7- पंढरीची वाट )

मी हा लोकसत्ता मधला लेख वाचला तेव्हा मला आणखी एका प्रसंगाची आठवण झाली.
ReplyDeleteफार वर्षपूर्वी, बहुधा १९९० साली, गणेशोत्सवात मालगुंडकरबुवांचे झालेले कीर्तन आठवले. त्यांनी उत्तररंगात ह्याच अभंगावर निरुपण केले होते. बुवांचा गळा छान होता. कीर्तन ऐकताना रंगून गेल्याचे आजही आठवते. अभंगाचा अर्थ स्मृतीत राहिला नाही हे वेगळे सांगायला नको!!
विकास