Wednesday, June 20, 2012

Posted on behalf of Priyanka


शिबीरामधून मी प्रत्येकवेळी मी नवनवीन अनुभव घेत गेले, त्यातूनच भरपूर वेळा मी तिथे पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टींचा उपयोग माझ्या भाचीच्या लग्नासाठी केला. या सर्व गोष्टी साध्य करीत असताना मी मानसिक दृष्ट्या खूप सुखावले म्हणूनच त्यातून मला मिळालेला आनंद मी आपणां सर्वांसोबत वाटू इच्छिते.
सर्व प्रथम मला हे आपण करावे असे वाटले, कारण लताआजींनी अद्वैतच्या विवाहाच्यावेळी ज्या काही आकर्षक गोष्टी घरी तयार केलेल्याहोत्या, त्या माझ्या लक्षात होत्या त्यातूनच मला मुख्य प्रेरणा मिळाली.
जेव्हा हल्लीच आम्हा आयांच्या संपूर्ण दिवसाच्या शिबीरात आम्हाला एक मोत्यांची सुरेख माळ करावयास शिकविली, तेव्हाच मी मनाशी ठरविले की, आपण या माळेच्या डिझाइनचा उपयोग लग्नातील वधू-वरांच्या मुंडावळया करण्यासाठी करायचा. मी तो विचार जेव्हा लताआजींना सांगितला, तेव्हा त्यांनीही मला ही कल्पना खूपच छान आहे असे सांगितले. एवढयावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी मला ताटाभोवतीची महिरप, लामणदिवा ठेवण्यासाठी जी रोवळी वापरतात ती सजविण्याबाबत सुचविले.त्याचे साहित्य सुध्दा कुठे मिळेल हे ही सांगितले. उत्साहाने स्वतकडील सजावटीच्या वस्तूसुध्दा दिल्या.
मला सर्व प्रथम वाटले की हे मी करू शकते का! पण लगेच मनात दुसरा विचार आला कि मी जर आता प्रयत्न नाही केला तर मी ही संधी नक्कीच गमाविणार. आणि तसेच पुढे असंही वाटलं का नाही मला जमणार? आपल्याच तर घरातील लग्न आहे तिथे कोणाशीही स्पर्धा नाही. आणि मी केलेल्या गोष्टींचे सर्वांना निश्चितच कौतुकच असणार हा मला विश्वास होता. मी खूप उत्साहाने कामाला लागले.
मी छान 2 रोवळया सजविल्या, मुंडावळया केल्या, ताटाभोवतीची महिरप तयार केली. हे सर्व करताना मला जेव्हा काही अडचणी आल्या तेव्हा मी आपल्या शिबीरातील सख्यांचा सल्ला घेतला. स्वरूपाला मी हक्काने सांगू शकले कि तिने मला भाचीच्या सासूबाईंच्या ओटीत द्यावयाच्या वस्तू ठेवण्यासाठी एक फोल्डर करून द्यावा तिनंही मला तो तितक्याच प्रेमानं करून दिला. लग्नसमारंभात द्यावयाच्या भेटवस्तूही आकर्षकरित्या सजविल्या. फुलांच्या माळांनी लग्न घर सजविले.
यातून मला निर्मितीचा आनंद तर मिळालाच सर्वात महत्वाचे म्हणजे मी काही थोडंफार करू शकते हा माझा स्वतबाबतचा विश्वास वाढला.

3 comments:

  1. priyanka khup chan keles ha anand weglach asato ,mala pan madhey madhey ase kahi tari karayche asate dhodya kalat je jamel te karate pan kahi goshtina muhurtach milat nahi

    ReplyDelete
  2. प्रांजळ लिहीले आहेस. आवडले. सुरुवात करताना वाटलेली भिती, नंतरचा आनंद छान व्यक्त झाला आहे. न घाबरता लिहीत राहा. कृती करत राहा.

    ReplyDelete