शिबिराचे महत्त्व जाणूनही न केलेला बदल याला खरे कारण म्हणजे माझा आळशीपणा व अबोलपणा.
तसेच आपल्यात काही गोष्टींची कमतरता आहे हे जाणून ती दूर करण्यासाठी दुसऱ्याची मदत घेणे यात वाटणारा कमीपणा. पण हा अबोलपणा आता खूपच महाग पडत आहे.
लताआजीनी तीन-चार वर्षांपूर्वी उन्मेशमधील एक चूक दाखवून दिली होती. पण आम्ही त्याच्याकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही. त्याचा मोठा परिणाम आम्हाला भोगावा लागला. त्यामुळे खूपच मानसिक त्रास झाला. त्यांनी जे सांगितले ते लगेच एकून, समजून घेउन, स्वतात योग्य बदल केला aसता तर हे घडलेच नसते, याची खंत आजही मनात आहे.
एखादे काम जबाबदारीने करायचे म्हटले तरी भीती वाटतेच. घेतलेले काम नीट पार नाही पडले, काही गोंधळ झाला तर?. याला महत्त्वाचे कारण लहानपणापासून कसलीच जबाबदारी न घेण्याची जडलेली सवय. त्यातून शिबिरातील काम म्हणजे मनावर खूप ताण येतो. ते नीट नाही झाले तर काय याची कायम मनात भीती असते. त्यामुळे पुढे येवून काहीच न करण्याकडे कल, पण तरी शिबिरात यायची इच्छा. आता मात्र स्वत:त बदल करणे आवश्यक आहे.
विशाखा
पहिलं काम कर तू स्वत: पोस्ट कर. जुन्या चूका विसरून परत त्या होणार नाहीत हे बघ. खत बाळगून काही उपयोग नाही. शिबिरातलेच काय घरातले काम करायलासुद्धा माझ्या मनावर ताण येतो. तेव्हा ताण विसरा आणि कामाला लागा.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete